बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या खूप चर्चेत आहे. बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तिच्या सर्वच भूमिकांना प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली आहे. अभिनयाबरोबरच ती आता राजकारणातदेखील सक्रिय झाली आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ती हिमाचल प्रदेशमधील मंडी या भागातून निवडून आली होती. पण आता मात्र ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. कंगनाचा आता नवीन चित्रपट ‘इमर्जन्सी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याआधीच तिने केलेले एक वक्तव्य चर्चेत आले आहे. (kangana ranaut on paparazi)
कंगना सध्या तिच्या आगामी चित्रपटाचया प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी ती पापाराजीवर चिडून तुरुंगात टाकण्याची भाषा करताना दिसली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये कंगना बोलत आहे की, “सगळ्या पापाराझींना पकडून तुरुंगात टाका. सहा सप्टेंबरलं ‘इमर्जन्सी’ लागणार आहे. या दिवशी मनोरंजनाची सर्व साधनं बंद ठेवण्यात येणार आहेत”.
कंगनाने तिच्या या चित्रपटाची घोषणा २०२१ साली केली होती. यावेळी तिने हा कोणताही राजकारणावर आधारित चित्रपट आहे पण इंदिरा गांधी यांची बायोपिक नाही. तसेच या चित्रपटामध्ये कंगना मुख्य भूमिकेमध्ये दिसून येत आहे आणि दिग्दर्शनदेखील करताना दिसून येत आहे. या चित्रपटात कंगनाव्यतिरिक्त अनुपम खेर, मिलिंद सोमण, महिमा चौधरी व श्रेयस तळपदेदेखील प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहे. श्रेयस या चित्रपटात अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार आहे तर अनुपम हे जयप्रकाश यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
या महिन्याच्या सुरुवातीलाच चित्रपटाचा ट्रेलर लॉंच करण्यास आला होता. तसेच कंगनाने राजकारणाचा तिच्या अभिनयावर कोणता परिणाम झाला? हे देखील सांगितले आहे. ती म्हणाली की, “मी अभिनय करणे सोडणार की नाही हे लोकांनी ठरवावं. मी असं कधीही म्हंटलं नाही की मी नेता होणार आहे. मी निवडणूक लढावी असं लोकांना वाटतं. आता उद्या जर लोकांना माझा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट आवडला आणि त्यांना मी अभिनय करताना आवडले तर मला वाटेल की मी अभिनयात यशस्वी झाले आहे. तरच मी माझं अभिनयाचं काम सुरु ठेवेन”.
पुढे ती म्हणाली की, “मला वाटतं की राजकारणात मला अधिक यश मिळालं आहे आणि जिथे आपली जास्त गरज असते तिथेच आपण जातो. अशा वेळी खूप चांगले वाटते. मी माझ्या जीवनात चांगले निर्णय घेईन. मला काय करायचं आहे? याबद्दल मी अजून काही ठरवलं नाही. मी कुठेही काम करु शकेन”. आता कंगनाचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतो हे पाहाण्यासारखे आहे.