Rubina Dilaik Abhinav Shukla Children : टेलिव्हिजन विश्वातील नेहमीच चर्चेत असणारी आणि लोकप्रिय जोडी म्हणजे रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला. रुबिना व अभिनव यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये जुळ्या मुलींना जन्म देत आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली. आई-बाबा झाल्यानंतर ही जोडी विशेष चर्चेत असलेली दिसली. सोशल मीडियावर मात्र त्यांनी त्यांच्या लेकींचे चेहरे काही दाखवले नव्हते. आता तब्बल ११ महिन्यांनंतर दोघांनीही आपल्या छोट्या देवदूतांचा चेहरा जगाला दाखवला आहे. रुबिना व अभिनव यांच्या लेकी एधा व जीवा यांनी आपल्या निरागसतेने सर्वांची मने जिंकली आहेत.
दोन्ही मुलींचे फोटो शेअर करत रुबिनाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “नवरात्रीच्या या शुभ मुहूर्तावर मी एधा व जीवाची ओळख करुन देत आहे. धीराने वाट पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार”. रुबिनाची ही पोस्ट व्हायरल होताच साऱ्यांच्या नजरा या पोस्टकडे लागून राहिल्या. दोन्ही गोड मुलींचं सगळेचजण कौतुक करताना दिसत आहेत. कपाळावर काळा तीट आणि हातात चांदीच्या बांगड्या घातलेल्या रुबिनाच्या मुली सगळ्यांची मने चोरत आहेत. या फोटोंमध्ये अभिनव त्याच्या मुलीला भरवताना दिसत आहे. मुलगी आणि वडिलांच्या चेहऱ्यावरचे हसू खूपच गोंडस असल्याचे चाहते सांगत आहेत.
रुबिना गेल्या वर्षी २७ नोव्हेंबर 2023 रोजी जुळ्या मुलींची आई झाली. रुबिना व अभिनवनेही सोशल मीडियावर चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. रुबिना तिच्या स्पष्टवक्ते शैलीसाठी ओळखली जाते. ती ‘बिग बॉस १४’ ची विजेती आहे. तिने २०१८ मध्ये अभिनवशी लग्न केले. अभिनव देखील अभिनेता आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केलेल्या पाहायला मिळत आहेत. कॉमेडियन भारती सिंगने ‘जय माता दी’ असे लिहिले, तर अभिनेत्री व भावी आई दृष्टि धामी म्हणाली, ‘किती सुंदर आहेत”.”सुगंधा मिश्रा यांनी लिहिले,”किती सुंदर. आई राणीसारखी सुंदर. मिनी माँ दुर्गा. देव तुम्हा दोघांनाही आशीर्वाद देवो”. एका चाहत्याने लिहिले, ‘रुबी आणि अभिची मिनी आवृत्ती”.”दुसर्याने कमेंट करत म्हटलं,”ओएमजी माझ्या सीता आणि गीता”.
रुबिना व अभिनवने जून २०१८ मध्ये शिमला येथे लग्न केले. यानंतर, सप्टेंबर २०२३ मध्ये तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या गरोदरपणाची घोषणा केली. रुबिना तिच्या निर्दोष शैलीसाठी ओळखली जाते. ती ‘बिग बॉस’ २०१४ ची विजेतीही होती. रुबिनाने आज इंडस्ट्रीमध्ये १६ वर्षांहून अधिक काळ घालवला आहे.