शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

इतक्या सुंदर व गोंडस दिसतायत रुबिना दिलैकच्या जुळ्या मुली, पहिल्यांदाच दाखवला चेहरा, नावंही आहेत खूप खास

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 4, 2024 | 11:26 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Rubina Dilaik Abhinav Shukla Children

रुबिना दिलैकच्या लेकींना पाहिलंत का?, दिसतायत इतक्या सुंदर

Rubina Dilaik Abhinav Shukla Children : टेलिव्हिजन विश्वातील नेहमीच चर्चेत असणारी आणि लोकप्रिय जोडी म्हणजे रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला. रुबिना व अभिनव यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये जुळ्या मुलींना जन्म देत आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली. आई-बाबा झाल्यानंतर ही जोडी विशेष चर्चेत असलेली दिसली. सोशल मीडियावर मात्र त्यांनी त्यांच्या लेकींचे चेहरे काही दाखवले नव्हते. आता तब्बल ११ महिन्यांनंतर दोघांनीही आपल्या छोट्या देवदूतांचा चेहरा जगाला दाखवला आहे. रुबिना व अभिनव यांच्या लेकी एधा व जीवा यांनी आपल्या निरागसतेने सर्वांची मने जिंकली आहेत.

दोन्ही मुलींचे फोटो शेअर करत रुबिनाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “नवरात्रीच्या या शुभ मुहूर्तावर मी एधा व जीवाची ओळख करुन देत आहे. धीराने वाट पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार”. रुबिनाची ही पोस्ट व्हायरल होताच साऱ्यांच्या नजरा या पोस्टकडे लागून राहिल्या. दोन्ही गोड मुलींचं सगळेचजण कौतुक करताना दिसत आहेत. कपाळावर काळा तीट आणि हातात चांदीच्या बांगड्या घातलेल्या रुबिनाच्या मुली सगळ्यांची मने चोरत आहेत. या फोटोंमध्ये अभिनव त्याच्या मुलीला भरवताना दिसत आहे. मुलगी आणि वडिलांच्या चेहऱ्यावरचे हसू खूपच गोंडस असल्याचे चाहते सांगत आहेत.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi मधून बाहेर पडताच वर्षा उसगांवकरांची पहिली प्रतिक्रिया, पोस्ट शेअर करत म्हणाल्या, “मित्र बनवले आणि…”

View this post on Instagram

A post shared by Abhinav Shukla (@ashukla09)

रुबिना गेल्या वर्षी २७ नोव्हेंबर 2023 रोजी जुळ्या मुलींची आई झाली. रुबिना व अभिनवनेही सोशल मीडियावर चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. रुबिना तिच्या स्पष्टवक्ते शैलीसाठी ओळखली जाते. ती ‘बिग बॉस १४’ ची विजेती आहे. तिने २०१८ मध्ये अभिनवशी लग्न केले. अभिनव देखील अभिनेता आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केलेल्या पाहायला मिळत आहेत. कॉमेडियन भारती सिंगने ‘जय माता दी’ असे लिहिले, तर अभिनेत्री व भावी आई दृष्टि धामी म्हणाली, ‘किती सुंदर आहेत”.”सुगंधा मिश्रा यांनी लिहिले,”किती सुंदर. आई राणीसारखी सुंदर. मिनी माँ दुर्गा. देव तुम्हा दोघांनाही आशीर्वाद देवो”. एका चाहत्याने लिहिले, ‘रुबी आणि अभिची मिनी आवृत्ती”.”दुसर्याने कमेंट करत म्हटलं,”ओएमजी माझ्या सीता आणि गीता”.

आणखी वाचा – Paaru Marathi Serial : २० वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?, अहिल्यादेवींचा भूतकाळ येणार समोर, उत्सुकता वाढली

रुबिना व अभिनवने जून २०१८ मध्ये शिमला येथे लग्न केले. यानंतर, सप्टेंबर २०२३ मध्ये तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या गरोदरपणाची घोषणा केली. रुबिना तिच्या निर्दोष शैलीसाठी ओळखली जाते. ती ‘बिग बॉस’ २०१४ ची विजेतीही होती. रुबिनाने आज इंडस्ट्रीमध्ये १६ वर्षांहून अधिक काळ घालवला आहे.

Tags: Rubina Dilaik Abhinav ShuklaRubina Dilaik Abhinav Shukla Childrentv actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Next Post
taarak mehta ka oolta chashma new sonu

'तारक मेहता...'ला मिळाली नवीन सोनू, कोण असणार 'ही' नवीन अभिनेत्री, निर्मात्यांकडून अधिकृत घोषणा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.