शनिवार, जून 13, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Paaru Marathi Serial : २० वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?, अहिल्यादेवींचा भूतकाळ येणार समोर, उत्सुकता वाढली

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 4, 2024 | 10:26 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Paaru Marathi Serial Update

पारू मालिकेत बहीण-भावाच्या नात्यातील दुराव्याचे कारण येणार समोर

Paaru Marathi Serial Update :  ‘पारू’ मालिकेत खूप मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे. मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, आता अखेर अहिल्यादेवींच्या इच्छेनुसार प्रीतम व दिशा यांचं लग्न लागणारच असतं. तर प्रियाच्या वडिलांनी म्हणजेच आबासाहेबांनी विरोध केल्यामुळे प्रीतम मुंबईला निघून आलेला असतो. इकडे अहिल्यादेवींनी त्यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु करुन ठेवलेली असते, त्यानुसार अहिल्यादेवी हळदीची तयारी करतात. प्रीतमला हळदही लागायला सुरुवात होते, तेव्हा दिशा तिच्या बॉयफ्रेंडला बाहेर भेटायला गेलेली असते. तितक्यात पारू तिच्या घरी दिवाबत्ती करण्यासाठी जात असते तेव्हा पारू दिशाला त्या मुलाबरोबर रेड हँड पकडते.

मात्र दिशा त्या वेळेला काहीच बोलत नाही आणि तिथून निघून जाते. त्यानंतर पारू ही गोष्ट आदित्यला सांगायचं ठरवते, आदित्यच्या रूम मध्ये येत ती आदित्यला सांगते की, मी दिशा मॅडमना आता एका मुलाबरोबर बाहेर पाहिलं. हळदी समारंभाचा कार्यक्रम उरकतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पारू व आदित्य बोलत असतात की, काही झालं तरी आज प्रीतम सरांचं आणि दिशा मॅडमचं लग्न होता कामा नये. हे लग्न न होण्यासाठी आपल्याला काहीतरी सुचवावच लागेल, तेव्हा आदित्य पारूला सांगतो की, तुला काही सुचतंय का तर बघ. आदित्यच्या लक्षात येतं की प्रीतम काही दिवसांपूर्वी सांगत होता की, दिशाचं बाहेर कुठेतरी प्रेम प्रकरण आहे.

आणखी वाचा – लाभले आम्हांस भाग्य…; मराठी भाषेला ‘अभिजात’ दर्जा मिळताच कलाकारांनी व्यक्त केला आनंद, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मानले आभार

तिचं कोणत्यातरी मुलावर प्रेम आहे, हे ऐकल्यावर पारूला घाम फुटतो, तेव्हा पारू सांगते, मला सुद्धा याबाबत माहित आहे. मी सुद्धा त्यांना एकत्र पाहिलं आहे. त्यानंतर पारू आदित्यला सगळं काही खरं खरं सांगते. एकीकडे अहिल्यादेवी व सयाजी म्हणजेच आबासाहेबांमध्ये वीस वर्षांपूर्वी नेमकं असं काय घडलेलं याची उत्सुकता साऱ्यांनाच लागून राहिलेली आहे. दोघांमधील बहिण भावाचं हे नातं कसं संपलं हे जाणून घेणे प्रेक्षकांनाही रंजक ठरतेय.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi मधून आणखी एक जण घेणार निरोप, कोण असेल हा सदस्य? ‘या’ स्पर्धकाच्या नावाची चर्चा

अशातच मालिकेच्या प्रोमोने साऱ्यांचे लक्ष वेधले, मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, अहिल्यादेवीना थेट पारूच विचारते, तुमच्या दोघांमध्ये असं काय झालं होतं ज्यामुळे तुमच्या नात्यात दुरावा आला?, आता अहिल्यादेवी पारुला या नात्यात आलेल्या दुराव्या बद्दल सांगणार का?, हे पाहणं रंजक ठरेल.

Tags: marathi serialpaaru marathi serialpaaru marathi serial update
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Bigg Boss Marathi Season 5 varsha usgaonkar exit

Bigg Boss Marathi मधून बाहेर पडताच वर्षा उसगांवकरांची पहिली प्रतिक्रिया, पोस्टद्वारे म्हणाल्या, "मित्र बनवले आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.