शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“चांगला अभिनेता गमावला”, ऋतुराज सिंह यांच्या अचानक निधनामुळे कलाकारांनाही भावना अनावर, म्हणाले, “खूपच दुःख होतं जेव्हा…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 21, 2024 | 12:18 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
rituraj singh death Arshad warsi, sneha wagh, sandeep sikand celebs reaction paid tribute to the actor

"चांगला अभिनेता गमावला", ऋतुराज सिंह यांच्या अचानक निधनामुळे कलाकारांनाही भावना अनावर, म्हणाले, "खूपच दुःख होतं जेव्हा..."

Rituraj Singh Death : हिंदी मनोरंजन विश्वातून नुकतीच एक दु:खद बातमी समोर आली. हिंदी मालिकांचा लोकप्रिय चेहरा ऋतुराज सिंह यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन् झाले. ४ दिवसांपूर्वी ‘दंगल’ फेम अभिनेत्री सुहानी भटनागरचे निधन् झाले होते. तिच्यानंतर ऋतुराज सिंह यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीत शोककळा पसरली आहे. वयाच्या ५९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.   

ऋतुराज यांच्या निधनावर मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार मंडळींकडून शोक व्यक्त केला जात आहे. अभिनेत्री स्नेहा वाघ, अर्शद वारसी, दीपिका सिंह, व संदीप सिकंदने दु:खद पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.  ‘ज्योती’ या लोकप्रिय मालिकेत अभिनेत्री स्नेहा वाघने असं म्हटलं आहे की, “ऋतुराज यांच्या निधनाच्या बातमीने मला धक्का बसला आहे. मी खूप लहान होते आणि मला आठवते की तो आम्हाला लहानपणी शिकवत होता. या शोमध्ये त्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती. आम्ही सेटवर असताना त्याच्या दिलखुलास वागण्याने संपूर्ण वातावरण बदलून जायचे. त्याने सर्वांना आनंदात ठेवले. अशा बातम्यांनी जाग येणे हे खूपच दु:खद आहे. काही दिवसांपूर्वीच आमच्या ‘ज्योती’ मालिकेला १५ वर्ष पूर्ण झाली होती आणि अशातच ऋतुराज यांच्या निधनाची बातमी मन हेलावून टाकणारी आहे”.

I am so saddened to know that Ritu Raj passed away. We lived in the same building, he was a part of my first film as a producer. Lost a friend and a great actor… will miss you brother…

— Arshad Warsi (@ArshadWarsi) February 20, 2024

आणखी वाचा – “बायकोवर विश्वास नाही आणि…”, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’वर प्रेक्षक नाराज, अधिपतीलाही केलं ट्रोल, म्हणाले, “चुकीच्या गोष्टींना…”

तर अर्शद वारसीने ऋतुराज यांच्या निधनावर पोस्ट शेअर करत असं म्हटलं की, “ऋतुराज यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. आम्ही एकाच इमारतीत राहत होतो. निर्माता म्हणून तो माझ्या पहिल्या चित्रपटाचा भाग होता. एक चांगला मित्र आणि अभिनेता गमावला. प्रिय ऋतुराज तुम्ही कायम स्मरणात राहाल. पिंकविलाच्या बातमीनुसार, अभिनेत्री दीपिका सिंह म्हणाली- “मी त्यांना फारसे ओळखत नव्हते, पण मी त्यांना एकदा भेटले होते आणि या पहिल्याच भेटीत ते माणूस म्हणून खरे वाटले. मला त्यांच्याबरोबर काम करायची इच्छा होती. पण आता ते कधीच होणार नाही”.

आणखी वाचा – “दंड भरुन सुटका…”, कुत्र्यांना मारहाण करणाऱ्या आरोपींची सुटका झाल्यानंतर सिद्धार्थ चांदेकरसह मराठी कलाकार भडकले, म्हणाले, “गुन्हेगार…”

निर्माता संदीप सिकंदनेही ऋतुराज यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करताना असं म्हटलं की, “ही बातमी ऐकून खूपच दुःख झाले. आज सकाळी कोणीतरी व्हॉट्सॲप ग्रुपवर हे पोस्ट केले आणि ते बघून मला धक्काच बसला. ‘कहानी घर घर की’मध्ये मी त्यांच्याबरोबर काम केले होते. दरम्यान, ऋतुराज यांना स्वादुपिंडाच्या उपचारासाठी काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यात सुधारणा होऊन ते घरी परतल्यावर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचे निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुंबालाच नव्हे तर चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.

Tags: Arhad Warsibollywood actorsdeath newsRituraj SinghRituraj Singh Death NewsSandeep Sikandsneha waghअरधड वारसीऋतुराज सिंहऋतुराज सिंह निधन बातमीनिधन बातमीबॉलिवूड कलाकारसंदीप सिकंदस्नेहा वाघ
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Sana javed arrived to watch the psl match fans teased her by taking sania mirza name video viral on social media

PSL सामना पाहण्यासाठी आलेल्या शोएब मलिकच्या तिसऱ्या पत्नीला सानिया मिर्झाच्या नावाने लोकांनी डिवचलं, चेहऱ्यावर राग अन्...; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.