छोट्या पडदयावरील मालिका या आजही अनेक प्रेक्षकांच्या मनाचा हळवा कोपरा आहेत. मालिकेची कथा, कलाकारांचा अभिनय यासह मालिकेत रोज येणारे नवनवीन ट्विस्ट याबद्दल चाहत्यांना कायमच उत्सुकता लागून राहिलेली असते. त्यामुळे प्रेक्षक त्यांना आवडणाऱ्या मालिकेबद्दल कायमच प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. मालिकेतील एखादी घटना, प्रसंग आवडला तर त्याला प्रतिसाद देतात, मात्र मालिकेतील काही आवडलं नाही तर त्याबद्दलही व्यक्त होतात.
‘झी मराठी’वरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका काही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. मालिकेतील नवनवीन ट्विस्ट्समुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे. अक्षरा-अधिपतीच्या जोडीला प्रेक्षकांनी अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक भागात नवीन काय पाहायला मिळणार? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झालेली असते. मात्र मालिकेतील सध्याच्या ट्विस्टवर अनेक प्रेक्षकांची नाराजी पाहायला मिळत आहे.
नुकताच या मालिकेचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. मालिकेच्या कथानकानुसार, अधिपतीने भुवनेश्वरीच्या सांगण्यावरून अक्षराला घराबाहेर काढले असल्याचे पाहायला मिळाले. यावर आता चारूहास म्हणजे अधिपतीचे वडील त्याला समजवतात. यावेळी ते “आई आपल्या मुलाच्या पांखात बळ भरते, त्याला ईमोशनल ब्लॅकमेल करून मिंधा करून ठेवत नाही, तुझ्या आईच्या सांगण्यावरुन तू तुझ्या बायकोला घराबाहेर काढलं आहेस. हे तू मान्य कर” असं म्हणत त्याला समजावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
अशातच आता चारूहासच्या अधिपतीला समजावण्याच्या या नवीन प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे. या नवीन प्रोमोवर नेटकऱ्यांनी अधिपतीच्या विरुद्ध अनेक नकारात्मक कमेंट्स केल्या आहेत. नेटकऱ्यांनी कमेंट्स करत असं म्हटलं आहे की, “या मालिकेचा आता कंटाळा यायला लागला आहे. अधिपतीला मानसोपचारातज्ञाकडे घेऊन जायला हवं, तेच त्याला बरं करतील, ही मालिका बेटा चित्रपटाची कॉपी आहे, बायकोवर विश्वास नाही, याचा अर्थ चुकीच्या गोष्टींना समर्थन करत असे दिसून येत आहे”.