सध्या सर्वत्र लाडक्या गणरायाचं जल्लोषात स्वागत केलं जात आहे. तर काही ठिकाणी बाप्पाला निरोप देताना प्रत्येकाचे डोळे देखील भरून आलेले पाहायला मिळत आहेत. सामान्य माणूस असो वा कोणी मोठा कलाकार प्रत्येकाच्या घरी तितक्याच आपुलकीने, श्रद्धेने बाप्पाची आराधना केली जाते. अभिनेता रितेश देशमुखच्या घरी देखील एका खास पद्धतीने बाप्पाचे स्वागत केले जाते. या संदर्भात एक व्हिडीओ देखील रितेशने त्याच्या इंस्टाग्रामवरून पोस्ट केला आहे. (Ritesh Deshmukh Ganpati)
रितेशने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये रितेश घरातील लहानमुलांसह घरीच बाप्पाची मूर्ती साकारताना पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये रितेश स्वतःच्या हाताने बाप्पाची मूर्ती साकारण्याचा आनंद घेताना दिसतोय. त्याच्यासह घरातील लहान मुलं देखील बाप्पाची मूर्ती बनवण्यात व्यस्त असल्याचं पाहायला मिळतंय. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये रितेशने लिहिलंय “गणपती बाप्पा मोरया. घरीच इकोफ्रेंडली गणपती बनवणं आणि त्याची घरीच विसर्जन करणं ही देशमुख कुटुंबाची पारंपरिक पद्धत आहे. गणपती आले कि घरातील प्रत्येक लहानमुलं त्यांचा त्यांचा बाप्पा साकारतात आणि प्रत्येक बाप्पा तेवढाच खास देखील असतो. खरच बाप्पा किती गोड दिसतो”.
हे देखील वाचा- Bigg Boss Marathi : वाईल्ड कार्ड स्पर्धकाने पहिल्याच दिवशी उतरवला निक्कीचा माज, टास्कदरम्यान नको म्हणतानाही थेट पाण्यात ढकललं अन्…
रितेशने पोस्ट केलेल्या व्हिडीओवर चाहत्यांसह अनेक कलाकारांनी देखील कमेंट करुन रितेश व मुलांचं कौतुक केलं आहे. बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री क्रिती सेनॉनने “खूप सुंदर. बाप्पाचं स्वागत करण्याची ही पद्धत खूप छान आहे ” अशी कमेंट करून देशमुख कुटुंबच कौतुक केलं आहे. तर गायिका श्रेया घोषालने “बाप्पाचं स्वागत करण्याची ही खूप गोड पद्धत आहे” असं म्हणत कौतुक केलं आहे. रितेश व मुलांसह जिनिलीयाच देखील कौतुक चाहत्यांनी केलं आहे “खरं तर जिनिलिया वहिनींना खूप खूप धन्यवाद ज्यांनी ही संस्कृती जपली आणि मुलांना पण छान संस्कार देत आहेत अभिनय करत असताना सुध्दा आपल्या मुलांकडे आणि संसाराकडे लक्ष देत आहेत आज कालचे जोडपे (couples) तर फक्त प्रसिद्ध होण्यासाठी हा सगळा दिखावा दाखवतात पण दादा वाहिनींना बघून खरच खूप अभिमान वाटतोय”. अशा शब्द चाहत्यांनी त्यांचं प्रेम व्यक्त केलं आहे.(Ritesh Deshmukh Ganpati)
हे देखील वाचा- काय असणार दीपिका पदुकोण व रणवीर सिंहच्या लेकीचं नाव? अभिनेत्याने केला होता खुलासा, पण…
रितेश-जिनिलीयाने आपल्या सुंदर अंदाजाने आजवर प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. रुपेरी पडद्यासह ही जोडी रील्सच्या माध्यमातून देखील नेहमी चर्चेत असते. रितेश-जिनिलीयाचे अनेक विनोदी रील्स सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत. रितेश सध्या आणखी एका गोष्टीमुळे चांगलाच चर्चेत आहे ती गोष्ट म्हणजे मराठी बिग बॉस सिझन ५. बिग बॉसच्या नवीन पर्वात रितेश निवेदकाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. बिग बॉस प्रेमींना देखील रितेशची ही भूमिका चांगलीच आवडलेली दिसत आहे. सर्वत्र त्याच्या निवेदनाचं कौतुक होताना पाहायला मिळतंय.