‘कुंकू टिकली आणि टॅटू’ आणि ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकांमधून आडोशाने आपल्या अभिनयाची छाप पाडली. आपल्या हटके लूकने प्रेक्षकांना भुरळ घालणारा आदिश वैद्य आणि मराठमोळी अभिनेत्री रेवती लेले हे दोघे रिलेशनशिप मध्ये आहेत. सोशल मीडियावरून त्यांनी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली. त्यांच्या पोस्टवरून ते एकमेकांवरील प्रेम नेहमीच व्यक्त करत असतात. रेवती आणि आदीश नेहमीच त्यांच्या फोटोंमुळे चर्चेत असतात. सोशल मीडियावरील त्यांचा वावरही बऱ्यापैकी आहे. रेवती आणि आदिशचा चाहतावर्गही खूप मोठा आहे.(Adish Vaidya Revati Lele)
पहा रेवतीची आदिशसाठी खास पोस्ट (Adish Vaidya Revati Lele)

अशातच रेवतीच्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. डिनर, ड्रिंक्स अँड म्युझिक असं कॅप्शन देत रेवतीने #डेटनाईट लिहिलं आहे. शिवाय आदिशला तिने या पोस्टमध्ये थँक यु असेही म्हटले आहे. तर रेवतीच्या या पोस्टवर आदिश ने कमेंट करत ओलाला असं लिहिलं आहे. रेवतीची ही आदिश सोबतची पोस्ट चाहत्यांच्या पसंतीस पडली आहे. चाहत्यांनी तिच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. आता रेवती आणि आदिश हे दोघे केव्हा लग्नबंधनात अडकणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

‘जिंदगी नॉट आउट’, ‘बॅरिस्टर बाबू’, ‘गुम है किसीं के प्यार में’, ‘नागीण’ या हिंदी मालिकांमधून आदिशने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं . ‘गुम है किसी के प्यार में’ या लोकप्रिय मालिकेतील आदिशची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. तर रेवती एक उत्कृष्ट नृत्यांगना असून आदिश आणि रेवती यांनी ‘नागीण’, ‘जिंदगी नॉट आउट’ या मालिकांमध्ये एकत्र काम केलं आहे. (Adish Vaidya Revati Lele)
रेवतीने कलर्स मराठी वाहिनीवरील ‘स्वामींनी’ या मालिकेत मोठया रामाबाईंची भूमिका साकारली होती. या भूमिकेतून रेवतीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. ‘वर्तुळ’, ‘आपकी नजरों ने समझा’ या मालिकांमध्येही रेवतीने भूमिका साकारल्या आहेत. रेवती आणि आदिश केव्हा लग्नबंधनात अडकणार हे अद्याप समोर आलेलं नाही. त्यामुळे चाहत्यांनाही त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली आहे.
