छोट्या पडद्यावरील ठरलं तर मग ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. यातील अर्जुन आणि सायली यांची जोडी देखील चाहत्यांच्या पसंतीस उतरते. तर या मालिकेत नुकतंच सायली आणि जुई यांचं लग्न पार पडलंय. जुई गडकरी या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसतेय. मालिकेतील मिस गडबडगोंधळ असणारी जुई प्रेक्षकांची मनं जिंकतेय. यासोबत ती सोशल मीडियावर देखील कमलाईची सक्रिय असलेली पाहायला मिळते.ती सोशल मीडियावर सेटवरील अनेक Bts व्हिडीओ शेअर करत असते. अशातच जुईने एक व्हिडीओ शेअर शेअर केला आहे, त्या व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.(Jui Gadkari Celebration Video)
ठरलं तर मग या मालिकेचे नुकतेच १०० एपिसोड पूर्ण झालेत. अल्पावधीतच या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका अव्वल स्थानावर आहे. अशातच ठरलं तर मग मालिकेच्या टीमने १०० भाग पूर्ण केल्याचं औचित्य साधत एक पिकनिक काढली होती. जुईने त्यांचा हा पिकनिकचा व्हिडीओ सोशल मीडियावरून पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ठरलं तर मग मालिकेतील कलाकारांचा धिंगाणा पाहायला मिळतोय. लोणावळा येथे त्यांची ही पिकनिक गेली होती तेथे त्यांनी काय काय मजा मस्ती केली आहे चला पाहुयात जुईने शेअर केलेल्या व्हिडिओमधून..
पहा ठरलं तर मग टीमची धमाल मस्ती (Jui Gadkari Celebration Video)
जुईने हा व्हिडीओ शेअर केला आहे सोबत कॅप्शन मध्ये तिने प्रेक्षकांचे आभार व्यक्त केलेत आणि मालिकेवर असच प्रेम करण्यास सांगितलंय. जुईच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करून त्यांचं अभिनंदन केलं आहे. मराठमोळी अभिनेत्री जुई गडकरी मागील दोन ते तीन वर्षांपासून अभिनयक्षेत्रापासून दूर राहिली होती. तिने ‘पुढचं पाऊल’, ‘सरस्वती’ यांसारख्या मराठी मालिकांमध्ये काम करत तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. या शिवाय ‘बिग बॉस मराठी’ या बहुचर्चित कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती.(Jui Gadkari Celebration Video)
“ठरलं तर मग” चे १०० भाग पुर्ण होत आहेत!!! असे म्हणत जुईने शेअर केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत होती. जुईने पोस्ट शेअर करत लिहिलं होत, ‘तो पहिला call आज खुप आठवतोय!! त्या एका कॅाल ने माझं लाईफ चेंज केलं!!! गेल्या जुलैला मी सोहम प्रॅाडक्शन्स चा भाग झाले!! आणि आज माझी ही फॅमिली १०० भागांची झाली!!! मी आज फक्त आणि फक्तं आभार मानते त्या सगळ्यांचे ज्यांनी विश्वास ठेऊन जुई ला “सायली” दिली!!! हि मालिका माझ्यासाठी खुप जास्तं “close to my heart” आहे!!
हे देखील वाचा – ‘डिनर, ड्रिंक्स अँड म्युझिक’, आदिश आणि रेवतीच्या डिनरडेटची चर्चा
कारण एका मोठ्या आजारपणातुन बाहेर पडताना या मालिकेने मला आपलंसं केलं! आणि मी आज एक पुर्ण वेगळं लाईफ अनुभवतेय!! या सेट ची, crew ची Positivity ईतकी आहे की मला परत मागे वळुन बघायचंच नाहिये!! मी फक्तं त्रुणी आहे त्या सगळ्यांची ज्यांनी माझी साथ कधीच सोडली नाही.. मला नेहेमी confidence दिला की मी करु शकेन! तुमचे आशिर्वाद शुभेच्छा नेहेमी पाठीशी असुद्या????????❤️ त्यातुनच मला ताकद मिळते रोज जोमाने काम करायची.
