काही दिवसांपूर्वी सई ताम्हणकरने ही नवं घर घेतलं असल्याची खुशखबर चाहत्यांसह शेअर केली. यंदाच्या दीपावलीला तर तिने सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींना नव्या घरी येण्याचं आमंत्रण दिलं होतं. अभिनेत्री सई ताम्हणकरच्या इन्स्टाग्राम पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ‘ओळखा पाहू’ अस कॅप्शन देत सईने एका व्यक्तीबरोबरचा पाठमोरा फोटो पोस्ट केला आहे. सईने शेअर केलेल्या या फोटोचं गुपित मात्र अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने उलगडलं आहे. (saie tamhankar and sonalee kulkarni)
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सोनालीने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टने सईच्या फोटोमागील गुपित उलगडलं आहे. सोनालीने सईला मिठी मारतानाचा एक फोटो पोस्ट केला आहे, या फोटोमध्ये सईला मिठी मारताना दिसत आहे. मात्र सईचा चेहरा दिसत नाही आहे. दरम्यान दोघींनी शेअर केलेल्या सारख्याच फोटोवरून सोनालीने सईच्या घरी भेट दिल्याचं कळत आहे.
सोनाली कुलकर्णी व तिचा नवरा कुणाल बेनोडेकरने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर दुबईत नवीन घर खरेदी केलं. दुबईतील नव्या आलिशान घरातील फोटो अभिनेत्रीने “पाडवा in the new होम” असं कॅप्शन देत फोटो शेअर केले होते. यानिमित्त सोनालीवर शुभेच्छांचा वर्षांव होताना पाहायला मिळाला. सोनालीच्या या पोस्टवर चाहत्यांसह कलाकार मंडळींनीही कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या. दरम्यान सई ताम्हणकरने ‘क्यूटी’ अशी कमेंट करत सोनालीच्या लूकचं कौतुक केलं. सईने केलेल्या या कमेंटवरील सोनालीने दिलेल्या प्रतिक्रियेने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
सोनालीने प्रतिउत्तर देत म्हटलं, “ते सर्व ठीक आहे, पण तू तुझ्या नवीन घरात कधी बोलवतेस ते सांग आधी”. यावर सईने प्रतिक्रिया देत “तुमचं लंडन, दुबई झालं की सांगा मॅडम” असं म्हटलं आहे. त्यावर सोनाली “राहू दे, राहू दे” असं म्हणत कमेंट केली होती. अखेर सोनालीने सईच्या नव्या घरी हजेरी लावली असल्याचं पाहायला मिळत आहे. कमेंटमधून सोनालीने नवीन घरात कधी बोलवतेस या टोमण्यावरून सईने सोनालीला आमंत्रण दिलेलं पाहायला मिळत आहे.