अभिनेत्री क्रांती रेडकरने तिच्या अभिनयाने व नृत्यकौशल्याने अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. क्रांती ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असणाऱ्या काही कलाकारांपैकी एक आहे. क्रांती ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिचे काही फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. त्याचबरोबर ती तिच्या लेकींचे व्हिडीओही शेअर करत असते. त्यांच्या अनेक करामती ती व्हिडीओद्वारे चाहत्यांबरोबर शेअर करत असते. अशातच तीन एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. (Kranti Redkar On Instagram)
क्रांतीने शेअर केलेला हा नवीन व्हिडीओ तिच्या आईचा आहे. यात आईने क्रांतीच्या बहिणीसाठी एक खास जेवणाचा बेत केला होता. यावरून क्रांतीने आईबरोबर साधलेल्या गमतीशीर विनोदाचा हा व्हिडीओ आहे. यात क्रांती आईला असं विचारते की, “माईने (क्रांतीची बहीण) काय खाल्लं?” त्यावर क्रांतीची आई उत्तर देत असं म्हणते की, “ज्वारीची भाकरी आणि शोले”. यावर पुन्हा क्रांती असं म्हणते की, “सलीम जावेद यांनी शोले बनवला होता. त्यानंतर आता माझ्या आईने शोले केला आणि त्याला भाकरीबरोबर माझ्या बहिणीला खायला दिला.”
आणखी वाचा – “मला पॉर्न बघायला आवडतं…”, ‘अॅनिमल’ला उद्देशून अर्शद वारसीचं मोठं वक्तव्य, म्हणाला “मला ते करायला…”
यानंतर आईने बनवलेली भाजी ही क्रांतीच्या बहिणीला आवडली खूप असल्याचे ती सांगते. तसेच ती मला भाजीची पाककृती विचारून गेल आहे आणि आता तिच्या घरी ही भाजी करणार असल्याचे सांगते. तसेच ती क्रांतीसाठी ही शोलेचे भाजी बनवणार असल्याचे या व्हिडीओमध्ये म्हणते. दरम्यान, क्रांतीच्या आईने छोलेचा उच्चार शोले असा केल्याने यातून निर्माण झालेली हलकी फुलकी गंमत क्रांतीने या व्हिडीओमधून तिच्या चाहत्यांना दाखवली आहे. क्रांती हे असे गंमतीशीर व्हिडीओ नेहमीच बनवत असते आणि अनेकांना हे असे व्हिडीओ आवडतातदेखील.
दरम्यान, क्रांतीने शेअर केलेल्या या मजेशीर व्हिडीओला नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. “तुमचे आईबरोबरचे व्हिडीओ खूप छान असतात, तुझी आई खूप निरागस आहे, माझी आई पण शोलेच म्हणते म्हणजे तुझे आई व माझी आइ मैत्रीणी आहेत वाटतं, खूप छान, किती गोड” अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी या व्हिडीओला पसंती दर्शवली आहे.