प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरचा चॅट शो ‘कॉफी विथ करण’ हिंदी टीव्हीमधील सर्वात जास्त चर्चेत राहणाऱ्या शोजपैकी एक आहे. या शोमध्ये आजवर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे. ज्यामध्ये अनेक गमतीजमती होतात, शिवाय या शोमधील कलाकारांची वक्तव्ये अनेकदा चर्चेत आलेली आहेत. अशात हा बहुचर्चित शो जेव्हा येणार असल्याची घोषणा केली, तेव्हापासून या शोची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागलेली आहे. लवकरच ‘कॉफी विथ करण’चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत असून याचा पहिला प्रोमो नुकतंच समोर आला आहे. (Ranveer Singh and Deepika Padukone in Koffee with Karan)
येत्या २८ ऑक्टोबरपासून हा प्रसिद्ध चॅट शो येणार आहे. ज्यामध्ये शोचे पहिले पाहुणे म्हणून अभिनेता रणवीर सिंह व अभिनेत्री दीपिका पदुकोण हे सहभागी होणार आहेत. या शोच्या पाहिला प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये रणवीर व दीपिका करणसह गप्पा मारताना त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासाही करत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर याची बरीच चर्चा होताना सध्या दिसते.
समोर आलेल्या या प्रोमोमध्ये, रणवीर व दीपिका करणच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देताना दिसतात. त्याचबरोबर हे तिघे धमाल मस्ती करतानाही दिसले. तसंच, या व्हिडीओमध्ये रणवीरने त्याच्या साखरपुड्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. करण रणवीरला त्याला दीपिकाबरोबरच्या साखरपुड्याबद्दल एक प्रश्न विचारतो. त्यावर तो म्हणाला, “आम्ही दोघांनी २०१५ मध्येच साखरपुडा उरकला होता. त्याच्याआधी जो कोणी येईल आणि तिला लग्नासाठी विचारेन, मी जाऊन लगेच तिला प्रपोज करेन.” त्यावर लगेच दीपिकाने “ऍडव्हान्स बुकिंग” असं उत्तर दिलं. पुढे दिग्दर्शक तिला ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटातील रॉकी रंधावाला डेट करण्यावरून विचारताच तिने मी रॉकी रंधावाशी लग्न केलं असल्याचा यात म्हटली आहे.
हे देखील वाचा – लहान भावाचं कर्करोगाचं ऑपरेशन अन्…; ‘तो’ प्रसंग सांगताना आदेश बांदेकरांना अश्रू अनावर, म्हणाले, “ऑपरेशन थिएटरमध्ये…”
सोशल मीडियावर हा प्रोमो प्रदर्शित येताच चाहते यावर विविध प्रतिक्रिया देत आहे. दरम्यान, करणचा हा नवा शो येत्या २८ ऑक्टोबरपासून ‘डिज्नी प्लस हॉटस्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहे. दीपिका पदुकोण सध्या हृतिक रोशनच्या ‘फायटर’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. तर रणवीर सिंह लवकरच ‘डॉन ३’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.