‘बिग बॉस मराठी’ या बहुचर्चित शोमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे सई लोकूर. ‘बिग बॉस’ मधून बाहेर आल्यानंतर सिनेसृष्टीतला तिचा वावर कमी झालेला पाहायला मिळाला. कारण या शोनंतर ती तिच्या संसारामध्ये रमली. ‘बिग बॉस मराठी’नंतर सईने लग्न करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. त्यानंतर पुन्हा एकदा तिने एक खास पोस्ट शेअर करत सगळ्यांना सुखद धक्का दिला. (sai lokur baby shower)
२०२१च्या नोव्हेंबरमध्ये सईने तीर्थदीप रॉयबरोबर थाटामाटात लग्न केलं. तिच्या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली. आता सई व तीर्थदीप आई-बाबा होणार आहेत. आपल्या बाळाची विशेष काळजी घेण्यासाठी सईने सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला आहे. अशातच सईने खास फोटोशूट करत गरोदर असल्याचं सांगितलं. त्यानंतर आता सईच्या खास डोहाळ जेवणाचे फोटो समोर आले आहेत. सईने तिच्या डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमासाठी जांभळ्या रंगाचा गाऊन, डोक्यावर फुलांचा सुंदर तिआरा, हातात फुलांची परडी असा सुंदर लूक केला होता. डोहाळे जेवणासाठी अभिनेत्रीच्या घरी रंगीबेरंगी फुगे आणि फुलांची सजावट करण्यात आली होती.
सईच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन तिच्या जवळच्या मैत्रिणींनी केलं होतं. यावेळी कार्यक्रमात तिच्या सर्व मैत्रिणी सहभागी झाल्या होत्या. त्यांनी लाडक्या सईसाठी खास तयारी केली होती. “माय फेरी टेल बेबी शॉवर” असं कॅप्शन सईने तिच्या डोहाळे जेवणाच्या फोटोंना दिलं आहे. “माझं स्वप्नातलं डोहाळ जेवण, मला एखाद्या राजकन्येसारखं वाटतंय”, असंही सईने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. सईच्या या डोहाळ जेवणाच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
आणखी वाचा – ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम लोकप्रिय अभिनेत्रीच्या आईचं निधन, फोटो शेअर करत दिली माहिती
“आम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की, आमचं कुटुंब आता पूर्ण होणार आहे” असं सईने फोटो शेअर करत गरोदर असल्याचं जाहीरपणे सांगितलं. सईने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती प्रेग्नंसी टेस्ट स्ट्रीप दाखवताना दिसली. तर एका फोटोमध्ये सई व तीर्थदीपचं लिप किस पाहायला मिळालं होतं, ज्याची सोशल मीडियावर फार चर्चा रंगली होती. या फोटोंमध्ये दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे पाहायला मिळाला.