सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लहान भावाचं कर्करोगाचं ऑपरेशन अन्…; ‘तो’ प्रसंग सांगताना आदेश बांदेकरांना अश्रू अनावर, म्हणाले, “ऑपरेशन थिएटरमध्ये…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 23, 2023 | 12:32 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Aadesh Bandekar got emotional on Saregamapa Little Champs

लहान भावाचं कर्करोगाचं ऑपरेशन अन्...; 'तो' प्रसंग सांगताना आदेश बांदेकरांना अश्रू अनावर, म्हणाले, "ऑपरेशन थिएटरमध्ये..."

झी मराठी वाहिनीवरील ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातील घराघरात पाहिला जातो. या कार्यक्रमामुळे अभिनेते आदेश बांदेकर हे तमाम महिलांचे लाडके भावोजी बनले आहे. २००४ मध्ये जेव्हा हा कार्यक्रम सुरु झाला, तेव्हा तो अवघ्या १३ एपिसोडचा होणार होता, मात्र रसिक प्रेक्षकांच्या प्रेमाखातर आज हा कार्यक्रम तब्बल १९ वर्ष अविरतपणे सुरु आहे. या यशामागे जितकं श्रेय आदेश बांदेकर यांचं आहे, तितकंच पडद्यामागील तंत्रज्ञाचे देखील आहे. दरम्यान, हा कार्यक्रम करत असताना आदेश यांना अनेक कठीण संकटांना सामोरं जावं लागलं होतं. मात्र, त्या संकटांत त्यांनी स्वतःला ‘शो मस्ट गो ऑन’ म्हणत त्या कुटुंबियांच्या आनंदात सहभागी झाले. (Aadesh Bandekar got emotional on Saregamapa Little Champs)

नुकतंच आदेश बांदेकर हे ‘सारेगमप लिटिल चॅम्पस’च्या विशेष भागात आले होते. यावेळी कार्यक्रमाची सूत्रसंचालिका मृण्मयी देशपांडेने आदेश बांदेकर यांच्याबद्दलचा एक व्हिडीओ दाखवला. या व्हिडिओमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचा भाग असलेल्या पडद्यामागील तंत्रज्ञानी आदेश यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. जे पाहून आदेश यांना अश्रू अनावर झाले. आणि कार्यक्रमाच्या यशाबद्दल बोलताना कार्यक्रमाच्या शूटदरम्यान त्यांच्या कुटुंबियांवर घडलेला एक प्रसंग त्यांनी सांगितला.

आदेश बांदेकर यावेळी म्हणाले, “माझ्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले, पण मी तेव्हाही बोललो आणि आजही बोलतो की त्यादिवशी हा कार्यक्रम कधीच थांबला नाही. माझ्या सख्ख्या लहान भावाचं कॅन्सरचं ऑपरेशन होतं, आणि त्याचवेळी मला अगदी हाकेच्या अंतरावर ‘होम मिनिस्टर’चा एपिसोड शूट करायचं होतं. तेव्हा मी क्षणाचा विचार न करता हा एपिसोड करायचा ठरवलं. पुढे मी डॉ. श्रीखंडे यांच्या क्लिनिकमध्ये माझ्या भावाला ऑपरेशन थिएटरला पाठवलं आणि सुचित्राला मी पाच मिनिटात येतो, असं सांगितलं. अत्यंत कठीण ऑपरेशन होतं ते. तेव्हा मी त्या क्लिनिक समोरील फुटपाथ ओलांडून माझे डोळे पुसले आणि तो एपिसोड शूट केला. हे जरी आमच्यासाठी दुःखाचा क्षण असेल, पण त्या घरासाठी तो आनंदाचा क्षण होता. त्यावेळी मी प्रामाणिक सेवा केल्याचं मला वाटत होतं.”

हे देखील वाचा – Video : “सर्दी, खोकला, ताप पण…” देवीच्या ‘उदो उदो’ गाण्यावर डान्स करताना सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला दैवी अनुभव, म्हणाली, “अंगात संचारताच…”

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

“काळाचौकीतून ढोल वाजवत सुरु झालेला हा प्रवास आज मला सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदापर्यंत घेऊन गेला. हे सर्व झी मराठीमुळे शक्य झालं, यात माझं काहीच श्रेय नाही. हे माझ्या आई-वडिलांनी माझ्यावर केलेले संस्कार आहे. सुचित्रा व सोहमने माझ्यावर दाखवलेला विश्वास आहे. आणि या महाराष्ट्रातील तमाम कुटुंबीयांचा, ज्यांनी त्यांचा घराचा दरवाजा माझ्यासाठी २४ तास उघडा ठेवला आणि मला आशीर्वाद दिला. त्यामुळेच माझा आणि होम मिनिस्टरचा हा प्रवास ना थांबता सुरु आहे.”, असं आदेश यावेळी म्हणाले. यावेळी आदेश यांनी सांगितलेला हा प्रसंग ऐकताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.

हे देखील वाचा – Video : “आतापर्यंत बरंच काही पाहिलंय पण…”, ‘बिग बॉस’ फेम मराठी अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “आता मात्र मी तिथे नसेन…”

View this post on Instagram

A post shared by Aadesh Bandekar (@aadesh_bandekar)

पुढे त्यांनी त्यांच्या टीमचे कौतुक करताना म्हणाले की, “‘होम मिनिस्टर’ची आमची ही संपूर्ण टीम २४ तास माझ्याबरोबर राहतात. जी माझ्या मागे शक्ती म्हणून उभी आहे. कारण हे माझं कुटुंब आहे, आणि हा कार्यक्रम कुटुंबाचा आहे. या संपूर्ण प्रवासात मी जसा असतो, तसे हे सगळे माझ्याबरोबर असतात. त्यादिवशी मला जेव्हा विषबाधा झाली, तेव्हा हीच मंडळी माझ्यासाठी उभी राहिली. त्यामुळे मी त्यांसाठी काही केलं नाही, त्यांनीच माझ्यासाठी एवढं केलेलं आहे. कदाचित या सगळ्यांची शक्ती म्हणून हे १९ वर्ष महाराष्ट्राच्या घराघरात जाऊन आनंद देण्याचं काम हा कार्यक्रम करत आहे.” हे सांगताना आदेश बांदेकर भावुक झाले होते.

Tags: Aadesh BandekarAadesh Bandekar got emotional on Saregamapa Little Champshome ministersaregamapa little champszee marathi
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
Next Post
Prajakta Mali On Jyotirling Yatra

प्राजक्ता माळी १२ ज्योतिर्लिंगाची यात्रा करणार, सुरुवात झाली म्हणत शेअर केले फोटो, म्हणाली, "परळी वैजनाथपासून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.