बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : “आतापर्यंत बरंच काही पाहिलंय पण…”, ‘बिग बॉस’ फेम मराठी अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “आता मात्र मी तिथे नसेन…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 23, 2023 | 11:51 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Akshay Kelkar New Post

Video : "आतापर्यंत बरंच काही पाहिलंय पण...", 'बिग बॉस' फेम मराठी अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, "आता मात्र मी तिथे नसेन…"

प्रत्येक कलाकार हा त्याची आवड जोपासत काम करत असतो. अभिनयबरोबरचं बऱ्याच आवडीनिवडी ही कलाकार मंडळी सोशल मीडियावरून चाहत्यांसह शेअर करताना दिसतात. अशातच सर्वांच्या लाडक्या अशा मराठमोळ्या कलाकाराने त्याची चित्रकलेची आवड जोपासली आहे. सुंदर असं बाप्पाचं चित्र काढतानाचा एक व्हिडीओ बिग बॉस विजेता अक्षय केळकरने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. त्याच्या या पोस्टबरोबरच्या कॅप्शनने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Akshay Kelkar New Post)

बाप्पाचं सुंदर असं चित्र रेखाटत अक्षयने लिहिलं आहे की, “आयुष्यात बाप्पाने मला खूप काही दिलं, सुरुवातीला, लहानपणी, चित्र म्हटलं की मी कायम बाप्पाचं चित्र काढायचो. लॉकडाऊन नंतर मी पुन्हा चित्रं काढायला सुरवात केली. माझ्या सगळ्या आवडत्या देवांची मी चित्र काढली आणि बाकीही बऱ्याच विषयांवर सतत चित्र काढली होतीच. पण जो मला लहानपणापासून सगळं काही देत आला, मोठं झाल्यावर मी त्याचं चित्र काढलंच नाही आणि आज हे पूर्ण केलंय! आणि पोटात खूsssssप मोठा गोळा आलाय. बाप्पाच्या पोटा पेक्षाही खूप मोठा कारण माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट घडणार आहे आणि ती ही त्यानेच दिलीय.”

आणखी वाचा – Video : “सर्दी, खोकला, ताप पण…” देवीच्या ‘उदो उदो’ गाण्यावर डान्स करताना सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला दैवी अनुभव, म्हणाली, “अंगात संचारताच…”

“आता हे चित्र आयुष्यभर अशा ठिकाणी राहणार जिकडे मी आतापर्यंत बरंच काही पाहिलंय पण आता मात्र मी तिथे नसेन, बाप्पा मी तिथून जाणार आहे आणि तू तिथे असशील. ते माझं होतं. कदाचित यासाठी माझ्या हातून इतकी वर्ष तुला घडायचं नव्हतं का रे ??? तू मला आता जे काही दिलंयस ना ते खूप आहे. काळजी घे तुझी आणि आता तू जिथे असणार आहेस तिथल्या लोकांची, माझी आणि माझ्या लोकांचीही. तुझा अक्षय.” अधिक भावुक पोस्ट अक्षयने शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kelkar (@akshaykelkar)

आणखी वाचा – कार्तिकी गायकवाडच्या ताफ्यात आणखी एका आलिशान कारची भर, कारची किंमत आहे इतकी

अक्षयने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक कलाकार मंडळींनी व त्याच्या चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. अभिनेत्री सुकन्या मोने यांनी “कित्ती दिवसांनी चित्र काढलं आहेस रे, फार सुंदर… गणपती बाप्पा मोरया!” अशी कमेंट केली आहे. तर अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने “वॉव, एकदम भारी भावा” अशी कमेंट केली आहे. अभिनेत्री समृद्धी केळकरने “अक्ष्या” असं कमेंट करत म्हटलं आहे.

Tags: akshay kelkarbigg bossbigg boss winnerentertainmentmarathi actormarathi serial
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
Aadesh Bandekar got emotional on Saregamapa Little Champs

लहान भावाचं कर्करोगाचं ऑपरेशन अन्…; 'तो' प्रसंग सांगताना आदेश बांदेकरांना अश्रू अनावर, म्हणाले, "ऑपरेशन थिएटरमध्ये…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.