दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा बहुचर्चित चित्रपट ‘जेलर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाची गाणी व ट्रेलर प्रदर्शित झाली, तेव्हापासून याची चर्चा जोरात सुरु आहे. रजनीकांत यांच्यासोबत अनेक कलाकार या चित्रपटात झळकणार असून बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ हेदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनवेळी जॅकी श्रॉफ यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. ज्यात रजनीकांत यांनी ‘जेलर’च्या सेटवर आपली माफी मागितल्याचे सांगितले आहे. (Rajinikanth apologized to Jackie Shroff during Jailer movie shoot)
अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत असा खुलासा केला आहे की, रजनीकांत यांनी चित्रपटाचे एक शेड्युल पूर्ण केल्यानंतर तिथून निघाले. मात्र आपण जॅकी श्रॉफला निरोप न देताच निघाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा रजनीकांत सेटवर परतले आणि जॅकी श्रॉफची माफी मागून त्यांना निरोप दिला. यावेळी इतक्या मोठ्या स्टारकडून मिळालेली ही प्रेमाची वागणूक पाहून जॅकी श्रॉफ देखील भारावून गेले होते.
हे देखील वाचा – ऑस्कर विजेत्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स’मधील आदिवासी जोडप्याचे निर्मात्यांवर गंभीर आरोप, म्हणाले, “आमच्याकडे दुर्लक्ष केलं अन्…”
हा किस्सा सांगताना जॅकी श्रॉफ म्हणाले की, “मला आठवतं, रजनीकांत हे त्या दिवसाचे शूट पूर्ण करून घरी जाण्यासाठी निघाले होते. मात्र, माझे काही सीन शूट करायचे बाकी असल्याने मी सेटवरच होतो. घाईगडबडीत ते त्यांच्या गाडीत बसून निघून गेले. मात्र काही वेळाने ते पुन्हा सेटवर आले. आणि ते थेट माझ्याकडे येत म्हणाले, ‘मला माफ करा, मी तुला बाय म्हणायला विसरलो. जर तुला माझी गरज असेल, तर मी इथेच थांबतो.’ रजनीकांतचे हे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू तरळले. पण, त्यावेळी मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवले. ज्या चित्रपटात ते स्वतः मुख्य अभिनेता आहेत, अशा चित्रपटात काम करताना मला खूप आनंद झाला. त्यांनी आम्हाला खूप प्रेम आणि आदर दिला असून आपल्या कुटुंबियांप्रमाणे त्यांनी आमची काळजी घेतली.” (Rajinikanth apologized to Jackie Shroff during Jailer movie shoot)
हे देखील वाचा – “साहेबांच्या हिंदुत्वाची…” धर्मवीर २ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित!
सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘जेलर’ चित्रपटाचे दिग्दर्शन नेल्सन यांनी केलं असून ज्यात रजनीकांत आणि जॅकी श्रॉफसोबत मोहनलाल, शिवा राजकुमार, राम्या कृष्णन, सुनील, तमन्ना भाटिया व अन्य कलाकार दिसणार आहेत. चित्रपट येत्या १० ऑगस्ट रोजी हिंदी, तामिळ व अन्य प्रादेशिक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Rajinikanth Jailer Movie)