Dharmaveer 2 poster release : वर्षभरापूर्वी प्रदर्शित झालेला ‘धर्मवीर मुक्काम पोश्ट ठाणे’ हा धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवन प्रवास उलगडणारा चित्रपट चांगलाच गाजला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय असणारे आनंद दिघे यांनी त्यांच्या आयुष्यात केलेल्या महत्वपूर्ण कामांचा उलगडा या चित्रपटातून करण्यात आला होता. या चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका अभिनेता प्रसाद ओकने साकारली होती. संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसाद ओकच्या च्या या भूमिकेचं कौतुक देखील झालं होतं. ‘धर्मवीर’ या चित्रपटाची धुरा सांभाळली होती अभिनेते,दिग्दर्शक, लेखक अशी ओळख असलेल्या प्रवीण तरडे यांनी. अभिनेते मंगेश देसाई हे धर्मवीर या चित्रपटाचे निर्माते होते. धर्मवीर चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या यशानंतर निर्मात्यांकडून धर्मवीर २ ची सुद्धा घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती.
नुकतंच चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे व निर्माते मंगेश देसाई यांनी ‘धर्मवीर २’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. जेजुरी येथे या धर्मवीर २ या चित्रपटाचे पोस्टर अनावरण करण्यात आले असून ‘धर्मवीर २ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ असे चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचं नाव असणार असल्याचं स्पष्ट होतंय. जेजुरी येथील खंडोबा देवस्थान येथे या पोस्टरचे अनावर करण्यात आले असून या प्रसंगी चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांच्यासह दिग्दर्शक प्रवीण तरडे देखील उपस्थित होते.(dharmaveer 2)
हे देखील वाचा- प्रविण तरडेंची मोठी घोषणा, एसएस राजामौलींच्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार, म्हणाले, “त्यांनी मला पाहिलं अन्…”
धर्मवीर चित्रपटाच्या पाहिल्या भागात कलाकारांचा अभिनय, चित्रपटातील संगीत, कथा या सर्वांच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. मुंबई, ठाणे येथे आनंद दिघे यांचं सामान्य जनतेप्रती असलेलं प्रेम, जिव्हाळा या चित्रपटातून दाखवण्यात आला होता. तर चित्रपटाच्या दुसऱ्या भागात नक्की काय असणार हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये दिसत आहे.(dharmveer anand dighe)
हे देखील वाचा – Subhedar Trailer : “आधी लगीन कोंढाण्याचं..” सुभेदार चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित
नव्याने प्रदर्शित झालेल्या पोस्टरनुसार चित्रपटाचे नाव ”धर्मवीर २ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ असं असल्याचं दिसतंय. तर आगमही भागात धर्मवीर आनंद दिघे यांची हिंदुत्वाप्रती असलेलं प्रेम आणि त्यासाठी त्यांची धडपड चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.