शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : भरकार्यक्रमात स्टेजवरच संकर्षण कऱ्हाडेकडून घडली ‘ती’ चूक, राज ठाकरेंनी ऐकताच लगेचच सुनावलं, नेमकं काय घडलं?

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 28, 2024 | 10:14 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Raj Thackeray give advice to Sankarshan Kharhade see the details

Video : भरकार्यक्रमात स्टेजवरच संकर्षण कऱ्हाडेकडून घडली 'ती' चूक, राज ठाकरेंनी ऐकताच लगेचच सुनावलं, नेमकं काय घडलं?

‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते व निर्माते प्रशांत दामले यांनी मोठी घोषणा केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अशोक सराफ यांच्या हस्ते ‘तिकिटालय’ या तिकीट बुकिंग ॲपचा शुभारंभ करण्यात आला आहे. मराठी मनोरंजनाचे तिकीट काढणाऱ्या रसिकांना भरपूर माहितीसह एखादं हक्काचं तिकीट बुकिंग ॲप हवं यासाठी प्रशांत दामले, चंद्रकांत लोकरे व अभिजित कदम यांनी एकत्र येत पीएसी थिएटर एंटरटेनमेंट प्रा. लि. (PAC) अंतर्गत हे ‘तिकिटालय’ ॲप सादर केलं आहे. 

यावेळी निवेदन करताना अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांचा ‘चंकु’ या टोपण नावाने उल्लेख केला. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी संकर्षणला कोपरखळी देत असं म्हटलं की, “संकर्षण जी, त्यादिवशी नाट्यसंमेलनामध्ये मी एक गोष्ट बोललो होतो की, आपल्या लोकांचा आदर आपणच केला पाहिजे. तर चंकू सर असं काही नसतं. त्यामुळे चंद्रकांत कुलकर्णी सर असतं हे मी समजू शकतो. मुळात या गोष्टी आपण यापुढे सुधारल्या पाहिजे. माझ्याकडे काही दिवसांपूर्वी श्रीरंग गोडबोले आले होते. त्यांनी मला सांगितलं की, मी कॅफे गुडलकमध्ये गेलो होतो. तिथे मी सांगितल की, मला आनंद रावांची दोन आमलेट द्या. कारण आता अंड्या बोलायचं नाही म्हटल्यानंतर पूर्ण नावच बोलायला लागणार. कोण कसं काय समजेल सांगू शकत नाही”.

आणखी वाचा – कपाळी मुंडावळ्या, हातात हिरवा चुडा अन्…; हळदीनंतर पूजा सावंतच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, साऊथ इंडियन लूकने वेधलं लक्ष

यानंतर राज ठाकरे यांचं भाषण संपताच संकर्षणने स्टेजवरच म्हटलं की, “मी मुंबईमध्ये आल्यापासून सगळ्यांना सर म्हणत आलो आहे. पण आज मलाच कानपिचकी मिळाली की, चंदू सर असं काही नसतं. पण चंद्रकांत कुलकर्णी सर आजपासून आम्ही तुम्हाला चंद्रकांत कुलकर्णी सर म्हणू”.

आणखी वाचा – मुळ युकेचा, दुबईमध्ये राहतो अन्…; सोनाली कुलकर्णीचा नवरा नक्की काय काम करतो?, पहिल्यांदाच अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “मोठमोठ्या बँकांमध्ये…”

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नाट्यसंमेलनामध्ये राज ठाकरे यांनी मराठी कलाकारांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे. एकमेकांना टोपणनावाने नाही तर त्यांना आदराने हाक मारली पाहिजे असं म्हणत मराठी कलाकारांचा खरपूस समाचार घेतला होता. यावर आता ‘तिकिटालय’ ॲपच्या शुभारंभाच्या या सोहळ्यातदेखील राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मराठी कलाकारांनी एकमेकांना  आदर देण्याबद्दल आठवण करून दिली आहे.  

Tags: entertainment newsmarathi actormarathi entertainment newsMarathi newsMNS Presidentraj thackeraysankarshan karhadeमनसे अध्यक्षमनोरंजन बातमीमराठी अभिनेतामराठी बातमीमराठी मनोरंजन बातमीराज ठाकरेसंकर्षण कऱ्हाडे
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
anjala javeri

आता कुठे आहे 'प्यार किया तो डरना क्या' चित्रपटामधील अंजला जवेरी? एका चित्रपटामुळे रातोरात प्रसिद्धी, बॉबी देओलबरोबर अफेअर आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.