सलमान खान व काजोलच्या ‘प्यार किया तो डरना क्या’ या सुपरहिट चित्रपटातील ‘तेरी जवानी बडी मस्त मस्त है…’ हे सुपरहिट गाणं अरबाज खान व अंजला जावेरी यांच्यावर चित्रीत करण्यात आले. अंजलाने या चित्रपटात उजाला नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. २६ वर्षांपूर्वी या गाण्यामुळे अंजला यांना लोकप्रियता मिळाली होती. अंजला झवेरी यांचा जन्म १९७१ वा १९७२मध्ये लंडनमध्ये झाला. त्यांनी १९९७ ते २०१२ या काळात सिने इंडस्ट्रीत काम केले, त्यानंतर त्या सिनेइंडस्ट्रीपासून दूर राहिल्या. (Anjala Zaveri)
अंजलाचा शोध विनोद खन्ना यांनी लावला होता. ‘हिमालय पुत्र’ या चित्रपटासाठी त्यांनी इंग्लंडमधून अंजला यांची निवड केली होती. त्यावेळी अंजला इंग्लंडमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होत्या. ‘हिमालय पुत्र’च्या ऑडिशनची जाहिरात पाहून दिलेल्या ऑडिशनदरम्यान त्यांची निवड झाली. विनोद खन्ना यांचा मुलगा अक्षय खन्ना याने या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटाशी संबंधित आणखी एक चर्चेत राहिलेली गोष्ट म्हणजे बॉबी देओल व अंजला यांचं अफेअर. त्या दरम्यान अंजला व बॉबी देओल यांच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या. यामुळे विनोद खन्ना चांगलेच नाराज झाले होते. अंजला यांनी फक्त तिच्या कामात लक्ष घालावे अशी त्याची इच्छा होती.
अंजला यांनी ‘बेताबी’ चित्रपटात अर्शद वारसी, चंद्रचूड सिंह, मयुरी कांगोसह काम केले. त्यानंतर त्या १९९८ मध्ये आलेल्या ‘प्यार किया तो डरना क्या’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात दिसली. यामध्ये सलमान खान, काजोल, अरबाज खानसह अनेक कलाकार दिसले. यानंतर अंजला साऊथ चित्रपटसृष्टीकडे वळल्या. त्यांनी चिरंजीवीसह ‘चूडलनी वंधी’चित्रपटात काम केले होते. टॉलिवूड चित्रपटांमध्येही त्या खूप यशस्वी ठरल्या.
२००२ मध्ये अंजला ‘सोच’, ‘मुस्कान’, ‘बाजार’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्येही दिसल्या होत्या, पण या चित्रपटांमुळे त्यांना तितकी लोकप्रियता मिळाली नाही. तेलुगु व्यतिरिक्त, तमिळ, मल्याळम व कन्नड भाषिक चित्रपटांमध्येही त्या महत्त्वपूर्ण कामगिरी करताना दिसल्या. ‘प्रेमिंचुकुंडम रा’ व ‘देवी पुत्रडू’ या चित्रपटातही त्या दिसल्या.’जब वी मेट’ चित्रपटातील अंशुमन सिंग ही भूमिका साकारणारा तरुण अरोरा हा अंजलाचा नवरा आहे. अभिनेता असण्याबरोबरचं तरुण एक मॉडेल व निर्माता देखील आहे. हिंदीशिवाय त्याने तेलुगू व तमिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे. अंजला या काही वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर गेल्या आहेत. २६ वर्षांपूर्वी त्या जशा दिसायच्या अगदी आजही त्या तितक्याच सुंदर दिसतात. सध्या त्या त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदी आहेत.