मालिका विश्वात सध्या काही आघाडीच्या मालिका आहेत ज्या प्रेक्षक दररोजच्या आयुष्यात न चुकता पाहत असतात. या मालिकांमधील प्रत्येक पात्रावर तेवढच भरभरून प्रेम प्रेक्षकांकडून केलं जात. मालिकांच्या यादीतील भाग्य दिले तू मला या मालिकेवर देखील प्रेक्षकांचा असाच आशीर्वाद राहीला आहे. मालिकेतील आवडती जोडी राज कावेरी म्हणजेच अभिनेत्री तन्वी मुंडले आणि अभिनेता विवेक सांगळे त्यांच्या पात्रांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.(Raj kaveri)
====
हे देखील वाचा- पडद्यामागचे नायक आता पडद्यावर सचिन गोस्वामी दिसणार नव्या भूमिकेत
====
बऱ्याच घडामोडीनंतर आता प्रेक्षक ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण आता आला असं म्हणायला हरकत नाही. राज कावेरीच्या लग्नाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. २६ फेब्रुवारी रोजी राज कावेरीचा विवाह सोहळा पार पडणार आहे. कलर्स वाहिनीने नुकत्याच पोस्ट केलेल्या प्रोमो मधून लग्नाच्या तारखेची माहिती देण्यात आली.
मालिका म्हणल कि नायकांसोबतच खलनायकाची भूमिका ही तेवढीच महत्वाची भूमिका असते. कावेरी आणि राजच्या आयुष्यात अडथळे आणणारी सानिया अँड टीम आता या शुभ समारंभात काही विघ्न आणणार का आणि रत्नमाला, राज, कावेरी हे विघ्न कसं दूर करणार आणि लग्न सुखरूप पार पडणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.(Raj kaveri)
राज कावेरी ही जोडी अल्पावधीच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे. भाग्य दिले तू मला या मालिके सोबतच अनेक इतर प्रोजेक्ट्स मध्ये सुद्धा ही जोडी झळकणार आहे.