कोणत्याही कार्यक्रमाची ओळख त्या कार्यक्रमाच्या कलाकारांपासून होते. “महाराष्ट्राची हास्यजत्रा” हा विनोदी रियालिटी शो जगभरात प्रसिद्ध झाला आहे.कोणत्याही मालिकेचा किंवा चित्रपटाचा एक प्रमुख घटक म्हणजे दिगदर्शक महाराष्ट्रासह देशाला खळखळून हसवणाऱ्या हास्यजत्रेचे महत्वाचे घटक आहे सचिन गोस्वामी. सचिन गोस्वामी हे पडद्यामागून कार्यक्रमाची सूत्र हलवताना दिसतात परंतु आता पडद्यामागचा हा नायक आता पडद्यावर अभिनय करताना दिसणार आहे.(sachin goswami)
====
हे देखील वाचा – वनिता नंतर निखिल आणि स्नेहल अडकणार लग्नबंधनात?
====
“पोस्ट ऑफिस उघडं आहे” या कार्यक्रमात सचिन गोस्वामी अभिनय करताना दिसणार आहेत. पारगावमध्ये नवीन झोनल ऑफिसर येणार आहे आणि त्या ऑफिसरची भूमिका सचिन गोस्वामी यात साकारताना आपल्याला दिसणार आहेत. या मालिकेची निर्मिती सचिन गोस्वामी यांच्या “वेट क्लाउड प्रोडक्शन” मार्फत होत आहे.
नवीन वर्षात सोनी मराठीवर “पोस्ट ऑफिस उघडं आहे” ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. प्रेक्षकांना या निमित्ताने एक वेगळा विषय मिळाला आहे. समीर चौघुले, वनिता खरात, दत्तू मोरे, शिवली परब, यांच्या सोबतच विनोदाच्या वेळेचे तरबेज हास्यवीर मकरंद अनासपुरे देखील या मालिकेत आपल्याला काम करताना दिसत आहेत. (sachin goswami)
====
हे देखील वाचा – ‘ मी माझ्या आईला ५०० वर्षे जगवणार’ सयाजी शिंदे यांचं विधान चर्चेत
====
नवीन पिढीने हा काळ अनुभवला नसून या मालिकेतून प्रेक्षक हा काळ अनुभवत आहेत, या मालिकेचे निर्माते मालिकेत अभिनय करताना दिसणार आहेत. सचिन गोस्वामी हे हास्यजत्रेच्या सेटवर नेहमीच मदत करताना दिसतात. तसेच ते कलाकारांचा मेकअप करताना देखील आपण पाहिलं आहे. लवकरच ते “पोस्ट ऑफिस” या मालिकेत दिसणार असल्याने प्रेक्षक त्यांना पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

सचिन गोस्वामी यांना नाटकांची आवड लहानपणापासून असल्यामुळे त्यांनी त्यांच्या करिअरची सुरूवात नाटकांपासूनच केली. सचिन गोस्वामींनी अनेक मालिका आणि चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले आहे.(sachin goswami)