मराठी चित्रपट सृष्टीचं नाव मोठं व्हावं या उद्देशानं प्रत्येक मराठी दिगदर्शक, निर्माता आणि कलाकार झटत असतो. असाच ध्येयवेडा दिगदर्शक ज्याच्या कलागुणांनी फक्त मराठीचं नाही तर इतर इंडस्ट्रीतील लोकांनासुद्धा भुरळ पाडली आहे. (anurag kashyap and nagraj manjule)
या दिगदर्शक, निर्माता, अभिनेता या सर्व क्षेत्रात अग्रेसर असणार नाव म्हणजे नागराज मंजुळे. सैराट, नाळ, झुंड असे धमाकेदार विषय घेऊन नागराज मंजुळे यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. नागराज मंजुळे यांच्या सैराट चित्रपटाने नवे विक्रम रचले. झुंड चित्रपटाने अनेक पुरस्कार जिंकले तर नाळ चित्रपटाने मायची नाळ किती घट्ट असते हे पुन्हा एकदा दाखून दिल.
====
हे देखील वाचा – साताऱ्याचा बच्चन लवकरचं मोठया पडद्यावर किरण माने मांजरेकरांच्या चित्रपटात साकारणार भूमिका
====
नागराज यांच्या दिगदर्शनावर सगळे फिदा आहेतच पण त्यांच्या अभिनयाचा व्यासंग ही तितकाच मोठा आहे. इंडस्ट्रीतील बऱ्याच दिग्ग्जणां नागराज मंजुळे यांचं कौतुक वाटत यातच एक महत्वाचं नाव म्हणजे इगदर्शक अनुराग कश्यप. काही दिवसांपूर्वी लल्लनटापला दिलेल्या मुलाखतीती अनुराग यांना नागराज मंजुळे यांच्या बाबतीत विचारण्यात आलं तेव्हा अनुराग यांनी सांगितलं नागराज हे खूप छान व्यक्तिमत्व आहे पुढे ते म्हणले नागराज हा असा व्यक्ती आहे जो जे बोलतो ते आपल्या लोकांसाठी करून दाखवतो. दिगदर्शना सोबतच तो खूप कमाल अभिनेता सुद्धा आहे. नागराज मंजुळे यांच्या बद्दल सांगताना मला त्यांना माझ्या चित्रपटात कास्ट सुद्धा करायचं आहे असं ही अनुराग कश्यप यांनी सांगितले.(anurag kashyap and nagraj manjule)
मराठी चित्रपट दिगदर्शकांची त्यांच्या कामाची दखल सर्वत्र घेतील जाते हे ऐकून प्रेक्षक तेवढेच सुखावले असतील. अफलातून चित्रपटांच्या यादीत नागराज मंजुळे यांचा ‘घर बंदूक बिरयाणी’ हा चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.