Kapoor Family Meet PM Narendra Modi : शोमॅन राज कपूर यांची १४ डिसेंबर रोजी १०० वी जयंती आहे. यानिमित्ताने कपूर परिवाराने १४ डिसेंबर रोजी आरके फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. या चित्रपट महोत्सवासाठी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यासाठी गेले होते. यावेळी संपूर्ण कपूर कुटुंब तिथे उपस्थित होते. त्याचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. आता करीना कपूर व नीतू कपूर यांनी पंतप्रधानांबरोबरच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. यावेळी करिश्मा कपूर, सैफ अली खान, रणबीर कपूर, आलिया भट्ट, रिद्धिमा कपूर, आदर जैन, अरमान जैन, नीतू सिंग आणि रीमा जैन यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यही दिसले. सर्वांनी पीएम मोदींबरोबर पोज देत फोटो काढले, सध्या हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
यावेळी करीना कपूरची मुले जेह आणि तैमूर तिच्याबरोबर नव्हते. पण करिनाने आपल्या मुलांसाठीही पीएम नरेंद्र मोदींची भेट खास ठरवली. त्यांनी जेह व तैमूरसाठी पीएम मोदींकडून ऑटोग्राफ घेतला. करीनाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये एका फोटोवर जेह व टिम असे लिहिले आहे, ज्यावर पंतप्रधान ऑटोग्राफ देत आहेत. यावेळी करीना कपूर लाल रंगाच्या फ्लॉवर प्रिंट सूटमध्ये दिसली. जड कानातले घालून तिने हा लूक पूर्ण केला. खुल्या केसांमध्ये आणि मॅचिंग बिंदीमध्ये ती खूप सुंदर दिसत होती.
आणखी वाचा – Paaru Marathi Serial : मोहनचा अपघात घडवून आणण्यात अनुष्काची चाल, पारूसमोर येणार का सत्य?, मोठा ट्विस्ट
फोटोंमध्ये पीएम मोदी संपूर्ण कपूर कुटुंबाशी बोलताना दिसत होते. फोटो शेअर करताना करिनाने लिहिले- “पीएम मोदींना आमंत्रण देताना आम्हाला खूप सन्मान वाटतो. या खास संध्याकाळसाठी मोदीजींचे आभार. तुमचे लक्ष आणि पाठिंबा देऊन हा मोलाचा दिवस साजरा करणे म्हणजे आमच्यासाठी जगासमान आहे”. करीनाने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत कौतुकाचा वर्षाव केला आहे.
आणखी वाचा – अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’चा वादाचा भोवरा, चित्रपटगृहात आढळला संशयास्पद मृतदेह, नेमकं प्रकरण काय?
करीना सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अनेकदा अभिनेत्री तिच्या लेकांसह एयरपोर्टवर वा घराबाहेर स्पॉट होताना दिसते. करीना कपूरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर. ती शेवटची ‘सिंघम’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात ती अजय देवगणच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती.