Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत एका मागोमाग एक ट्विस्ट येताना पाहायला मिळतात. एकीकडे आदित्य व पारू अवॉर्ड फंक्शनसाठी जायला निघालेले असतात. त्यांची जाण्याची घाई सुरु असते. तर अनुष्काच्या येण्यान पारू व आदित्यमध्ये दुरावा येताना पाहायला मिळतो. अहिल्यादेवींचा आशीर्वाद घेऊन सगळेजण जायला निघतात तेव्हा श्रीकांत पारूची आठवण काढतो. तेव्हा अनुष्का सांगते मी पारुला जाऊन पाहून येते असं म्हणत ती पारूला शोधत शोधत आदित्यच्या खोलीत येते. तर पारू तिथे आदित्यचे बूट घेऊन जात असते. त्याच वेळेला अनुष्का पारूची चांगलीच कान उघडणी करते. पारूला सांगते की, तू आदित्य भोवती सतत फिरत राहू नकोस. त्याला त्याचं काम करु दे. त्याची एवढी मोठी कंपनी आहे तू त्याच्या अवतीभवती असलीस की त्याला काय काम करायचं हे कळत नाही.
हे ऐकल्यावर पारू सुद्धा बोलते की, मला आता माझी जागा कळली आहे त्यामुळे मी आता आदित्य सरांच्या भोवती फिरणार नाही. त्यानंतर दोघेही खाली येतात. गाडी जवळ पारू त्या चपला घेऊन चपलांशी बोलत असते आणि सांगते की, आज पासून मी तुमच्याशी बोलत जाईन. माझी जागा आणि तुमची जागा ही एक समान आहे. त्यातच तिथे दामिनी येते आणि दामिनी विचारते, तू काय लपवत आहेस. तेव्हा पारू चपला दाखवते. तेव्हा दामिनी मध्ये येत चपला घेऊन तू काय करतेस असं विचारते. तितक्यात तिथे आदित्य येतो. आदित्य पारूच्या हातात चपला पाहून म्हणतो की, तू का माझ्या चपला आणल्या आहेस, मी आणणारच होतो. असं म्हणतो आणि तिच्या हातातून चपला काढून घेतो आणि गाडीमध्ये ठेवतो. त्यानंतर अहिल्यादेवी व श्रीकांत येतात. तेव्हा दोघेही सुखानं प्रवास करा असं त्यांना सांगतात.
आणखी वाचा – सुनील पाल यांनी स्वत:च रचला स्वतःच्या अपहरणाचा खेळ?, ऑडिओ व्हायरल होताच म्हणाले, “डोक्यावर बंदूक असेल तर…”
त्यावेळेला पारू आदित्यला सतत मालक सर मालक सर म्हणत असते, तेव्हा आदित्य तिला म्हणतो हे मालक सर, मालक सर काय लावलं आहेस. यावर अनुष्का सांगते की, आता तू कंपनीचा मालक आहेस आणि त्यामुळे ती कदाचित तुला मालक सर असं म्हणत असेल. तेव्हा आदित्य सगळंच काही लाईटली घेतो आणि गाडीत अनुष्काला बसायला देतो. त्यानंतर पारू आदित्यसाठी दरवाजा उघडते. तेव्हा आदित्य सांगतो, आधी तू बस. मात्र पारू सांगते आधी मालक सर तुम्ही बसा आणि आदित्यला बसायला लावते. त्यानंतर ती स्वतः गाडीत बसते. गाडीत बसल्यावर पारू आदित्यला सतत काहीना काही प्रश्न विचारू लागते. यामुळे आदित्यची चिडचिड होते आणि तो पारुवर ओरडतो. मात्र आदित्यला कळत नाही की, पारू नेमकं असं का करत आहे?, मध्येच ते एका मंदिरात दर्शनासाठी थांबतात तेव्हा अनुष्काला फोन येतो म्हणून ती बाजूला जाते तेव्हा आदित्य पारुला विचारतो तू अशी का वागत आहेस आणि तू मला सारखं मालक सर असं का म्हणत आहेस.
आणखी वाचा – सुनील पालनंतर आणखी एका सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचे अपहरण, कार्यक्रमासाठी बोलावलं अन्…; नेमकं काय झालं?
यावर पारू सांगते, मी तर तुमची नोकर आहे ना आणि तुम्ही आमचे मालक आहात. मी तुमच्याकडे काम करणारी साधी मुलगी आहे. आदित्यला तेव्हा कदाचित लक्षात आलं असावं की पारूने माझं बोलणं ऐकलं असेल. आता मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, मोहन व गुरुजी जाणाऱ्या गाडीचा अपघात होताना दिसतो आणि तो अपघात अनुष्का घडवून आणते आणि अनुष्का फोनवर बोलत असते, तितक्यात पारू तिथे येते. आता अनुष्काचं बोलणं पारूने ऐकलं असेल का हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.