बॉलिवूड अभिनेत्री काजोल सध्या खूप चर्चेत आली आहे. काजोलने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. काजोल सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असलेली बघायला मिळते. नुकतीच काजोलने केलेली सोशल मीडिया पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. यामध्ये तिने तिच्या घरातील लाइट बिलामधील गडबड तिने सांगितली आहे. काजोलने इन्स्टाग्राम स्टोरीवर याबद्दलचा खुलासा केला आहे. त्यामुळे आता याबद्दलची चर्चा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. ही पोस्ट नेमकी कशाबद्दल आहे? या पोस्टमध्ये नक्की काय आहे? याबद्दल आपण आता सविस्तरपणे जाणून घेऊया. तसेच ही पोस्ट इतकी का चर्चेत आली? हेदेखील जाणून घेऊया. (kajol on lightbill)
महागाईचा फटका आता केवळ सामान्य जनतेलाच नाही तर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनादेखील बसला आहे. नुकतीच कजोलने केलेली सोशल मीडिया पोस्टमध्ये याबद्दलचा खुलासा केला आहे. लाइटबिल बघून ती हैराण झाली आहे. काजोलने इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, “मला माझं वीजबिल मिळालं. मला वाटत आहे की हे सूर्याच्या उजेडाचं बिल आहे. डिव्हाइन लाइटसाठी व बोगद्यात लावलेल्या शेवटच्या लाइटसाठी हे बिल आलं आहे”.
काजोल व अजय हे दोघही मुलांबरोबर जुहू येथील एका अलिशान बंगल्यात राहतात. त्यांच्या बंगल्याचे नाव शिवशक्ती आहे. त्यांच्या या अलिशान बंगल्याची किंमत ६० कोटी रुपये आहे. दरम्यान काजोल व अजय यांची मुंबईमध्ये खूप संपत्ती आहे. काही दिवसांपूर्वीच जुहू येथे अजयने ऑफिससाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च केला आहे.
दरम्यान काजोलच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, याआधी ती ‘दो पत्ती’ या चित्रपटात दिसून आली होती. यामध्ये तिच्याबरोबर क्रिती सॅननदेखील दिसून आली होती. तसेच शाहीर शेखदेखील खलनायकाच्या भूमिकेत दिसून आला होता. यामध्ये काजोलने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. तसेच अजय देवगणचा ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. काजोल आता ‘महाराघीनी’ या चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये प्रभू देवादेखील असणार आहे.