Pushpa 2 Worldwide Collection : अल्लू अर्जुनचा चित्रपट ‘पुष्पा २’ बॉक्स ऑफिसवर दबदबा निर्माण करत आहे. सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २’मध्ये अल्लू अर्जुनबरोबर रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल मुख्य भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात २९४ कोटींचा गल्ला जमवला आहे. आता अवघ्या सहा दिवसांत या चित्रपटाने १००० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरात ‘पुष्पा २’ लाट निर्माण करत आहे. लोकांना या चित्रपटाचे अक्षरशः वेड लागले आहे. सोशल मीडियावरील ‘पुष्पा २’ च्या अधिकृत पेजने १००० कोटी रुपयांच्या कलेक्शनची पोस्ट रिट्विट केली आहे.
या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “#पुष्पा २ ने अवघ्या सहा दिवसात जगभरात १००० कोटी रुपये कमावले. आणखी एक सार्वकालिक विक्रम!!”. चित्रपटाने रिलीजच्या पाच दिवसात ₹९२२ कोटी कमाईचा टप्पा गाठला आणि हा विक्रम साध्य करणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला. बाहुबलीने १० दिवसांत १००० कोटींचा आकडा पार केला होता. आतापर्यंत ‘बाहुबली २’ हा सर्वात जलद १००० कोटी कमावणारा चित्रपट होता पण आता हा विक्रम ‘पुष्पा २’ ने मोडला आहे.
आणखी वाचा – Tharla Tar Mag : “शेवटी सासू ती सासूच असते”, कल्पनाने सायलीला हाताला धरुन काढलं बाहेर, प्रोमोवर नेटकरी भडकले
बाहुबलीनंतर एसएस राजामौलीचा ‘आरआरआर’ या यादीत आहे. ज्याने १६ दिवसात ही कमाई केली होती. तर शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाला १००० कोटींची कमाई करण्यासाठी तब्बल १८ दिवस लागले. ‘पुष्पा २’ च्या जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर पहिल्या दिवशी २९४ कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी ४४९ कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी ६२१ कोटी रुपये, चौथ्या दिवशी ८२९ कोटी रुपये, पाचव्या दिवशी ९२२ कोटी रुपये कमावले आहेत.
आणखी वाचा – विक्रांत मेस्सीचा बहुचर्चित ‘द साबरमती रिपोर्ट’ आता ओटीटीवर येणार, कधी व कुठे पाहता येणार? जाणून घ्या…
तर सहाव्या दिवशी कलेक्शन १००० कोटींहून अधिक झाले आहे. sacnicच्या अहवालानुसार, ‘पुष्पा २’ ने आत्तापर्यंत भारतात ६४५.९५ कोटी रुपये जमा केले आहेत. चित्रपटात फहाद फासिल पोलिस अधिकारी भंगवार सिंह शेखावत यांची भूमिका साकारत आहेत. त्याच वेळी, अल्लू अर्जुन पुन्हा लाल चंदन तस्कर पुष्पा राज बनून वर्चस्व गाजवत आहे.