‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे कार्तिकी गायकवाड घराघरांत लोकप्रिय झाली. या कार्यक्रमामध्ये कार्तिकीने गायलेलं ‘घागर घेऊन…’ हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं होतं. कार्तिकीला घरातूनच गाण्याचा वारसा लाभलेला आहे. आपल्या सुमधूर आवाजाने गायिकेने प्रेक्षकांचं मन बालपणीच जिंकून घेतलं होतं. शो संपल्यावर काही वर्षांनी कार्तिकी गाण्यांचे कार्यक्रम करू लागली. याशिवाय तिने विविध अल्बममध्ये देखील गाणी गायली आहेत. गायिका सोशल मीडियावरही बरीच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. (Kartiki Gaikwad Gifted an Expensive Mobile by Husband)
कार्तिकी सोशल मीडियावर स्वतःच्या गाण्याचे व्हिडीओ तसेच पती रोनित पिसेबरोबरचे रोमॅंटिक फोटो शेअर करत असते. २०२० मध्ये कार्तिकीने रोनित पिसेशी लग्नगाठ बांधली आणि त्यांच्या लग्नाला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. अशातच नुकताच कार्तिकी व रोनित यांच्या लग्नाचा वाढदिवस झाला. यानिमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला होता. लग्नाच्या वाढदिवसाला कार्तिकीला तिच्या नवऱ्याने खास गिफ्ट दिलं आहे. कार्तिकीला नवऱ्याने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त महागडा मोबाईल गिफ्ट म्हणून दिला आहे.

आणखी वाचा – विक्रांत मेस्सीचा बहुचर्चित ‘द साबरमती रिपोर्ट’ आता ओटीटीवर येणार, कधी व कुठे पाहता येणार? जाणून घ्या…
नवऱ्याने दिलेल्या महागड्या मोबाईलचा खास व्हिडीओ कार्तिकीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर कार्तिकीने महागड्या मोबाईलबरोबरचा व्हिडीओ शेअर केला आहे आणि असं म्हटलं आहे की, “लग्नाच्या वाढदिवसाचे सलिब्रेशन” असं म्हणत तिने नवरा रोनित पिसेला टॅग केलं आहे आणि हा महागडा मोबाईल गिफ्ट दिल्याचेही सांगितले आहे.

आणखी वाचा – ‘सातव्या मुलीची…’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार, शूटचा शेवटचा दिवस, सेटवरील व्हिडीओ व्हायरल
दरम्यान कार्तिकी आणि रोनित यांचा लग्नसोहळा मोठ्या दिमाखात पार पडला होता. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नानंतर कार्तिकी आणि रोनित थायलंडलाही गेले होते. त्यांच्या थायलंड ट्रीपची चर्चा सर्वत्र रंगली होती. अशातच नुकतीच गायिका आई झाली असून या खास क्षणाचे फोटोही तिने आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केले होते.