निर्माती एकता कपूर आणि दिग्दर्शक धीरज सरना यांचा ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट गेल्या महिन्यात १५ नोव्हेंबर रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता. अभिनेता विक्रांत मेस्सी, अभिनेत्री व राशी खन्ना आणि रिद्धी डोग्रा यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. एवढेच नाही तर चित्रपट समीक्षकांकडूनही या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक व समीक्षकांकडून चित्रपटाचे कौतुक झाल्यानंतर व यश मिळवल्यानंतर, ‘द साबरमती रिपोर्ट’ आता ओटीटी प्रदर्शनासाठी सज्जा झाला आहे. हा चित्रपट कधी आणि कोणत्या ओटीटी प्रदर्शनावर प्रदर्शित होणार हे जाणून घ्या… (The Sabarmati Report OTT released)
चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर, चित्रपट ४५-५० दिवसांत ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतात. यानुसार, ‘द साबरमती रिपोर्ट’ लवकरच ओटीटीवर देखील लॉंच होणार आहे. एकता कपूरच्या बालाजी फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या, ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटाचे ओटीटी अधिकार ZEE5 या प्लॅटफॉर्मकडे आहेत. अर्थात याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. चित्रपटाच्या ओटीटी रिलीजच्या तारखेची माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु असे मानले जाते की, हा चित्रपट डिसेंबरच्या शेवटी आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्याच्या सुरुवातीला प्रदर्शित केला जाऊ शकतो.
२७ फेब्रुवारी २००२ रोजी गुजरातमधील गोध्रा येथे भीषण रेल्वे अपघात झाला. ज्यामध्ये ५९ जणांना आपला जीव गमवावा लागला. मृतांमध्ये बहुतांश महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. या कथानकाच्या पडद्यामागची सत्यता ‘द साबरमती रिपोर्ट’मध्ये दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाबाबत बरेच वाद झाल्याचे पाहायला मिळाले. या चित्रपटाबाबत अनेक स्तरातून संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळालं. तसंच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या चित्रपटाचे कौतुक केले होते.
आणखी वाचा – ‘सातव्या मुलीची…’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार, शूटचा शेवटचा दिवस, सेटवरील व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, ‘द साबरमती रिपोर्ट’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर नजर टाकली तर या चित्रपटाने सुरुवातीच्या वीकेंडपर्यंत जवळपास ६.४० कोटींचा व्यवसाय केला. मात्र, देशातील अनेक मोठ्या राज्यांमध्ये ‘द साबरमती रिपोर्ट’ करमुक्त होताच चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी वाढ झाली. आतापर्यंत या चित्रपटाने २५ दिवसांत जवळपास २८ कोटींची कमाई केली आहे.