Tharla Tar Mag Serial Update : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका एका उंचीवर येऊन पोहोचली आहे. मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असताना मालिकेत आलेल्या मोठ्या ट्विस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मालिकेत एकीकडे सायली व अर्जुन एकमेकांवरील प्रेमाची कबुली देण्यास सज्ज झाले आहेत. यासाठी दोघे डिनर डेटही प्लॅन करतात. मालिकेत अर्जुन व सायली एकमेकांवरील प्रेमाची कबुली देण्यास रेस्टोरंटमध्ये जातात. तर एकीकडे प्रिया सायली व अर्जुन यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज सर्वांसमोर कसं येईल हे पाहत असते. सायली व अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त प्रियाला त्यांचं हे खोट्या लग्नाचं सत्य सर्वांसमोर आणायचं असतं. त्यासाठी प्रिया अस्मिताला हाताशी घेते. सायली व अर्जुन घरात नाही ही संधी साधत प्रिया त्यांच्या खोलीची झडती घेते.
मालिकेत अखेर प्रियाच्या हाती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स लागलेले असतात. आणि प्रिया सर्व कुटुंबीयांसमोर याचा खुलासा करते. याने घरातील सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. कल्पना रागारागातच अर्जुनला फोन करते. त्यावेळी अर्जुन सायलीसमोर प्रेमाची कबुली द्यायला जाणारच असतो इतक्यात कल्पनाचा फोन येतो. फोनवर कल्पनाचा पारा चढलेला असतो. ते पाहून अर्जुन व सायली तडकाफडकी घरी निघून येतात. सायली व अर्जुन घरी येताच कल्पना दोघांचा चांगलाच पाणउतारा करते.
अशातच मालिकेचा एक नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये कल्पना सायलीला हाताला धरुन बाहेर काढताना दिसत आहे. मालिकेच्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, कल्पना सायलीला म्हणते, “सायली तुला घराबाहेर काढायची वेळ आली आहे, चल निघ”. यावर सायली आई, आई असं ओरडते. तर कल्पना सायलीच्या हाताला धरून तिला बाहेर काढते. तेव्हा अर्जुन म्हणतो, “चूक फक्त सायलीची नाही आहे, तर चूक माझीही आहे. मी ही या घराबाहेर जाणार”. आणि तो सायलीचा हात धरतो, तेव्हा सायली अर्जुनचा हात सोडते आणि तुम्हाला माझी शपथ आहे असं म्हणते.
आणखी वाचा – नातीसाठी आजीचं कौतुकास्पद पाऊल, दीपिका पदुकोणची लेक तीन महिन्यांची होताच सासूने दान केले केस, कारण…
त्यांनतर मधू भाऊ सायलीचा हात पकडून तिला घेऊन जातात. हा प्रोमो पाहून नेटकरी खूप भडकलेले दिसत आहेत. “शेवटी सासूने लायली दाखवली”, “शेवटी सासू ती सासूच असते”, “आता लेखकाने प्रिया तन्वी नाही हे पण दाखवावे. ती किती खोटं वागली ते पण दाखवले जावे. आता मालिका फास्ट करावी”, अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.