Pushpa 2 Leaked Online : अल्लू अर्जुन स्टारर ‘पुष्पा 2: द रुल’ हा चित्रपट ५ डिसेंबरला सर्वत्र चर्चेत राहून प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले असून चित्रपटात रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तीन वर्षांनंतर, थिएटरमध्ये अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये एक शर्यत लागली आहे, ज्यामुळे चित्रपटाचे आगाऊ बुकिंग झाले आहे. ‘पुष्पा २’ चित्रपटगृहात येऊन अवघे काही तास झाले आहेत आणि त्याच्याशी संबंधित धक्कादायक बातम्या येत आहेत. वास्तविक हा चित्रपट पायरसी साइटवर ऑनलाइन उपलब्ध असल्याचंही समोर आलं आहे. बिग बजेट चित्रपटाला चित्रपटगृहांमध्ये अवघ्या काही तासांत प्रचंड प्रतिसाद मिळत असताना चित्रपट लीक होणं अत्यंत चिंतेची बाब आहे.
‘पुष्पा २’ ची क्रेझ चाहत्यांमध्ये वाढत आहे. या चित्रपटाची जगभरात २५० कोटींहून अधिकची ओपनिंग अपेक्षित आहे. मात्र त्याआधीच चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठा धक्का बसला आहे. वास्तविक हा चित्रपट फुल एचडी प्रिंटमध्ये ऑनलाइन लीक झाला आहे. ‘न्यूज १८’च्या रिपोर्टनुसार, अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 Ibomma, Movierulz, Tamilrockers, Filmyzilla, Tamilyogi, Tamilblasters, Bolly4U, Jaisha Movies, 9xMovies आणि Moviesda सारख्या पायरसी प्लॅटफॉर्मवर विनामूल्य डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे आणि लोक ते 1080p, 720p, 480p, 360p, 240p, HD मध्ये डाउनलोड करत आहेत आणि ते विनामूल्य पाहत आहेत.
आणखी वाचा – नागा चैतन्य-शोभिताच्या लग्नानंतर नागार्जुन भावुक, नव्या सूनेसाठी खास पोस्ट, म्हणाले, “तू आमच्या आयुष्यात…”
‘पुष्पा 2 द रुल’ मूव्ही डाउनलोड, पुष्पा 2 द रुल मूव्ही एचडी डाउनलोड, पुष्पा 2 द रुल तमिलरॉकर्स, पुष्पा 2 द रुल फिल्मझिला, पुष्पा 2 द रुल टेलिग्राम लिंक, पुष्पा 2 द रुल मूव्ही विनामूल्य एचडी डाउनलोड या नावांनी हा शोध उपलब्ध होत आहे. सुकुमार दिग्दर्शित हा चित्रपट २०२१ च्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पुष्पा द राइज’चा सिक्वेल आहे. अल्लूला पुष्पासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. तर Mythri Movie Makers आणि Muttamsetti Media निर्मित ‘पुष्पा २’ मध्ये, अल्लू अर्जुन पुष्पा राज, रश्मिका मंदान्ना श्रीवल्लीच्या भूमिकेत आणि फहद फासिल भंवर सिंग शेखावतच्या भूमिकेत परतले आहेत.
अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘पुष्पा 2: द रुल’ आज ५ डिसेंबर २०२४ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. एक दिवसआधी, बुधवारी रात्री, आरटीसी चौकात असलेल्या संध्या थिएटरमध्ये या चित्रपटाचा प्रीमियर शो झाला, ज्यामध्ये एका ३९ वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागला. तर एका मुलाची प्रकृती गंभीर झाली आहे. तो त्या महिलेचा धाकटा मुलगा असल्याचे बोललं जात आहे.