रविवार, जून 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

निवृत्तीच्या घोषणेनंतर विक्रांत मेस्सीची चित्रीकरणाला सुरुवात, ‘या’ अभिनेत्रीबरोबर करणार काम, डेहराडूनमधील व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 5, 2024 | 11:38 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bollywood actor Vikrant Massey started shooting again after announcing his retirement and the video from Dehradun viral on social media.

विक्रांत मेस्सीने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर पुन्हा एकदा चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. चित्रपट २०२५ मध्ये रिलीज होऊ शकतो.

अभिनेता विक्रांत मेस्सीने सोमवारी 2 डिसेंबरला अभिनयातून संन्यास घेत असणारी पोस्ट केली होती आणि त्यानंतर मात्र २४ तासातच त्यांने आपल्या केलेल्या वक्तव्याबद्दल घुमजाव केलेले आहे. अवघ्या २४ तासांमध्ये यूटर्न घेत विक्रांतने आपल्या पोस्टचा चुकीचा अर्थ काढला आहे, असे म्हटले. ना मी निवृत्ती घेतली, ना मी इंडस्ट्रीला रामराम ठोकला आहे. माझ्या पोस्टचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. मला फक्त एक ब्रेक हवा आहे, असे विक्रांतने म्हटले. विक्रांतने काही चित्रपट साईन केलेले असून त्याचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर तो ब्रेक घेणार आहे, असेही त्याने सांगितले. अशातच आता तो पुन्हा एकदा शूटिंगवर पुन्हा परतला आहे. (Vikrant Massey Started Shooting)

विक्रांत मेस्सी पुन्हा एकदा सेटवर परतला आहे. त्याने नुकतेच शनाया कपूरबरोबर डेहराडूनमध्ये ‘आँखों की गुस्ताखियां’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. डेहराडूनमध्ये शूटिंग सुरू झाल्यानंतर विक्रांत मेस्सीचा उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याबरोबरचा त्यांच्या भेटीचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ते एकमेकांना हस्तांदोलन करताना आणि बोलताना दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Vikrant Massey (@vikrantmassey)

आणखी वाचा – इरफान खानशी तुलना होत असल्याने नैराश्येत आहे बाबिल खान, अभिनेत्याच्या आईचा मोठा खुलासा, म्हणाली, “त्याच्यावर खूप दबाव…”

विक्रांत मेस्सीने डेहराडून येथे ‘आँखो की गुस्ताखिया’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या चित्रपटात शनाया कपूर मुख्य भूमिकेत आहे. त्याचवेळी, संजय कपूर आणि महीप कपूर यांची मुलगी शनाया या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. ‘आँखों की गुस्ताखियां’ या चित्रपटात विक्रांत एका संगीतकाराची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट २०२५ मध्ये रिलीज होऊ शकतो.

आणखी वाचा – शुभमंगल सावधान! नागा चैतन्य व शोभिता धुलिपाला अखेर विवाहबंधनात अडकले, पारंपरिक पद्धतीने पार पडला लग्नसोहळा, फोटो व्हायरल

दरम्यान, विक्रांतने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर त्याचे चाहते नाराज झाले होते. मात्र त्याच्या निवृत्तीपूर्वी ‘झिरो से रीस्टार्ट’ हा चित्रपट येणार आहे. जो ’12th फेल’चा सिक्वेल असेल. याशिवाय तो ‘यार जिगरी’मध्येही दिसणार आहे. सध्या या चित्रपटांच्या प्री-प्रॉडक्शनचे काम सुरू आहे. त्यामुळे त्याच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.

Tags: shanaya kapoorshanaya kapoor movievikrant massey and shanaya kapoor movieVikrant Massey Started Shooting
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Prapti Redkar
Entertainment

‘सावली’ साकारताना संगीताशी घट्ट नातं जडलं, माझे माहेर पंढरी २.०’ शूट करताना प्राप्ती रेडकरला अश्रू अनावर

जून 20, 2026 | 3:16 pm
 kanika maheshwari faced harassment
Entertainment

अश्लील इशारे, घाणेरडी नजर आणि…; १३व्या वर्षी अभिनेत्रीसह घडला वाईट प्रकार, म्हणाली…

जून 20, 2026 | 1:00 pm
Raghavendra Rao Viral Video
Entertainment

दिग्दर्शकाचा स्वतःवरचा ताबा सुटला?, अभिनेत्रीला जवळ ओढलं आणि…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

जून 20, 2026 | 11:30 am
sunil grover sleeps on footpath
Entertainment

थेट फुटपाथवर चादर पसरून रात्र काढली, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला पाहून नेटकरी अवाक, म्हणाले

जून 20, 2026 | 9:40 am
Next Post
Nagarjuna Akkineni Got Emotional

नागा चैतन्य-शोभिताच्या लग्नानंतर नागार्जुन भावुक, नव्या सूनेसाठी खास पोस्ट, म्हणाले, "तू आमच्या आयुष्यात…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.