महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाने साऱ्यांनाच खळखळून हसवले. महाराष्ट्रातील हा असा एकमेव शो आहे ज्याने सगळ्यांच्या टेन्शवरील मात्रा दूर करण्यास भाग पाडतो. या कार्यक्रमातील सगळेच कलाकार एकापेक्षा एक आहेत. या कार्यक्रमातील सगळ्याच पात्रांवर चाहते भरभरून प्रेम करतात. विनोदी शैलीमुळे हे कलाकार प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतात. (pruthvik pratap mhj entry)
या कार्यक्रमातील सर्वांचा लाडका असा एक अभिनेता म्हणजे पृथ्वीक प्रताप. मालिकाविश्वात पृथ्वीकने काम केले मात्र पृथ्वीकला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळेच. या लोकप्रिय कार्यक्रमामुळे पृथ्वीकला खरी ओळख मिळाली, दरम्यान या कार्यक्रमात त्याची नेमकी एंट्री कशी झाली याबाबत पृथ्वीकने खुलासा केला आहे.
पहा पृथ्वीकची हास्यजत्रेत एंट्री कशी झाली –(pruthvik pratap mhj entry)
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती दरम्यान पृथ्वीकने भाष्य केले आहे. या दरम्यान तो असे म्हणाला की, “मी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे निर्माते सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांना आधीच ओळखत होतो. ते आधी ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ कार्यक्रम करायचे. मी आधी त्यासाठी ऑडिशन दिली होती मात्र त्यांनी मला नाकारले होते. मी दुखावलो होतो तसेच माझा अहंकार दुखावला गेला होता.”
====
हे देखील वाचा – तेजश्रीची लंडनला निघाली स्वारी, नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस
====
“नंतर मी त्यांच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाची ऑडिशन देण्याचे ठरवले आणि माझी निवड झाली. सचिन सरांनी मला ४ ते ५ स्किट्स दिल्या होत्या, ज्यात मला माझी क्षमता दाखवायची होती. मी कार्यक्रमाचा दुसरा सीजन जिंकला मात्र काहीतरी कमतरता राहिली होती.” असे म्हणत पृथ्वीकने हास्यजत्रेतील एंट्रीबद्दल म्हटले.(pruthvik pratap mhj entry)
कमतरता तर सगळ्यांमध्येच असतात, मात्र आपल्यातील कमतरता अचूक ओळखून त्यावर १०० टक्के काम करत पृथ्वीकने महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत आपली कला सादर केली. विनोदी कला अंगी असलेल्या पृथ्वीकने अल्पावधीतच साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. आणि स्वतःला सिद्ध केलं. महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे निर्माते सचिन गोस्वामी यांनी पृथ्वीकला दिलेल्या संधीच पृथ्वीकने सोनं केलं आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
पृथ्वीकने मराठीसह हिंदीतही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. ८३ या हिंदी चित्रपटात त्याने काम केलं आहे.