मालिकांमधून घराघरात पोहचली अभिनेत्री तेजश्री प्रधान हीने तिच्या अभिनय कौशल्याने देखील रुपेरी पडद्यावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. तिला घराघरातील लाडकी अभिनेत्री म्हणून ओळखल जातं. उत्तम अभिनय शैलीमुळे तिची सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्ट चर्चेत असते. ती सध्या सिनेविश्र्वापासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. तिच्या अभिनय शैलीमुळे तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.ती तिच्या फोटो,व्हिडिओद्वारे चाहत्यांशी संपर्कात राहते. तसेच ती तिच्या आगामी प्रॉजेक्टची माहिती देखील चाहत्यांना देत असते. अश्यातच तिने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.(Tejashree Pradhan)
तेजश्रीचा सध्या सिनेसृष्टीत कमी वावर असलेला पाहायला मिळतो. तरीही चाहते तिच्या नवीन प्रोजेक्ट विषयी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. तर आता देखील तिने केलेल्या पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधलं. तेजश्री पुन्हा एक नवीन प्रोजेक्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येतेय.

====
हे देखील वाचा- रक्तामंदी उसळं तापता लाव्हा…’ अंगावर शाहारे आणणारं सुभेदारच मोशन पोस्टर प्रदर्शित
====
तेजश्रीने नुकतच तिच्या इंस्टाग्राम तिने एक फोटो शेअर केला..या फोटो एअरपोर्ट वरील असून यात ती स्मितहास्य देताना पाहायला मिळते. लगेजसोबत हा फोटो शेअर केला असून तिच्या कॅप्शनवरून ती लंडनला जाणार असल्याचं समजतय. सी यू इंडिया,#londoncalling #happylife अस कॅप्शन तिने दिल आहे.तर तिच्या या फोटोवर अनेक चाहत्यांन सोबत कलाकारांनी देखील रॉक कारके आ, कम बॅक सून, हैप्पी जर्नी असं म्हंटल, तर एकाने कुठे निगाली ही सवारी असा प्रश्न विचारलाय? तर त्यावर तेजश्रीने प्रतिक्रिया देत लंडन , मुव्ही शूट असं म्हटलंय. तर ती लवकरच एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तर यामुळे आता सगळे चाहते खूपच जास्त आंनदी झाले आहेत. तिला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक झालेत. तर ती आता कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार? या चित्रपटात तिची कोणती भूमिका असणार ?, तसेच तिच्यासोबत आणखी कोणते कलाकार पाहायला मिळणार हे पाहणंआता उत्सुकतेचं ठरणार आहे. (Tejashree Pradhan)

होणार सून मी या घरची, अग्गंबाई सासूबाई, अश्या अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत. तेजश्रीने रंगभूमीवर देखील आपल्या अभिनयाची छाप उमटवली. तिने अनेक नाटकातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
