सध्या काही चित्रपट ओळखले जातात त्यातील कलाकारांच्या जोडी मुळे पण जोडीची हि प्रथा अगदी आधी पासून चालत आली आहे. मग ती जोडी अभिनेत्यांची असो, लेखकांची असो व निर्माते, गायकांची प्रेक्षक त्या जोडीला पाहायला आतुरलेले असायचे, जोडी मधला एक साथीदार पडद्यावर दिसला नाही कि प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची आर्धी उत्सुकता तिथेच संपायची आणि कधी कधी चित्रपट न चालण्याचं हे एक कारण सुद्धा व्हायचं. मराठी चित्रपट सृष्टीत एकेकाळी असच घडलं होत ते दिगदर्शक महेश कोठारे यांच्या सोबत या बाबतचा किस्सा त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात सांगितला आहे.(Mahesh Lakshya movies)
एखाद्या जोडीची प्रेक्षकांना इतकी आवड निर्माण झालेली असते कि एक दिसला तर दुसरा नक्की येणार असं त्यांनी गृहीतच धरलेलं असायचं पण जिवलगाच्या निर्मितीत असं घडलं नाही. पडद्यामागे महेश कोठारे आणि पडद्यावर वर लक्ष्मीकांत बेर्डे पण दोघे एकत्रच न दिसल्याने हा चित्रपट पडला कि काय शाशंका महेश यांनाही होती आणि ती त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे याना बोलून सुद्धा दाखवली.
====
हे देखील वाचा- विश्वासाच्या नजरेने पसंत करत, सुरु झाली होती महेश कोठारेंची लव्हस्टोरी
====

लक्ष्मीकांत बेर्डे याना बोलून सुद्धा दाखवली. झपाटलेलाच्या तयारीपूर्वी महेश लक्ष्याला म्हणाले होते ‘ लक्ष्या प्रेक्षकांना आता फक्त ‘महेश- लक्ष्या’ हेच कॉम्बिनेशन हवं आहे. ‘तू ओरडणार महेश महेश आणि मी म्हणणार लक्ष्या मी आलोच’ हेच ट्युनिंग प्रेक्षकांना बघायचं आहे. त्यामुळॆ आता पुन्हा आपण या कडे लक्ष देऊयात आणि महेश कोठारे यांनी लक्ष्मीकांत यांना झपाटलेलाची कहाणी सांगितली. आणि सुरवात झाली पुन्हा एकदा महेश लक्ष्याच्या जोडीच्या नवीन चित्रपटाची.(Mahesh Lakshya movies)

या जोडीने एकत्र काम केलेल्या अनेक चित्रपटांनी रुपेरी पडदा गाजवला. दे दणादण, झपाटलेला, थरथराट अशा अनेक चित्रपटांमधून हि जोडी प्रेक्षकांसमोर आली आणि प्रेक्षकांच्या मनात कायम एक वेगळं घर करून राहिली. चित्रपटाच्या यशाच्या हा फॉर्मुला असू शकतो हे तेव्हा या जोडीने ठळकपणे स्पष्ट करून दाखवलं.