‘बिग बॉस’चा नवा १७वा सिझन सुरु होऊन आता एक आठवडा उलटून गेला आहे. हळूहळू या शोमधील प्रत्येक स्पर्धकाची व्यक्तीरेखा आता समोर यायला लागल्या आहेत. कार्यक्रमात बरेच स्पर्धक सहभागी झाले आहेत. यात प्रियांकाची चुलत बहीण मन्नारा चोप्राही सहभागी आहे. सुरवातीपासूनच प्रेक्षकांकडून तिला बरंच प्रेम मिळत आलं आहे. पण ‘बिग बॉस’च्या घरात मात्र तिचं कोणाशीच पटत नसल्याचं पाहायला मिळतं. या कार्यक्रमाला सुरु होऊन एक आठवडाच झाला असला तरीही या प्रत्येक दिवशी मन्नारा बऱ्याचदा रडताना दिसली आहे. त्यामुळे ती चर्चेत आहे पण तिला असलेल्या आजारामुुळेही ती बरीच चर्चेत आहे. (mannara suffered an anxiety attack)
नुकत्याच झालेल्या भागात ती भावनिकदृष्ट्या तुटून गेलेली दिसली. मागील काही भागांमध्ये तिच्यावर बराच भावनिक आघात झालेला पाहायला मिळाला. त्यात ती बरीच अस्वस्थही दिसली. नुकत्याच झालेल्या भागात तिला अचानक अॅग्जायटीचा अटैक आलेला पाहायला मिळाला. तिला पाहताच घरवालेही चिंताग्रस्त झालेले पाहायला मिळाले. ज्यामुळे तिच्या प्रकृतीबद्दल चाहते चिंता व्यक्त करत आहेत. अशातच अॅग्जायटी अटॅक काय असतो? तो केव्हा येतो? अॅग्जायटी अटॅकची समस्या आजच्या काळातील पिढीमध्ये बरीच मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
अॅग्जायटी अटॅक एक मानसिक समस्या आहे. नकारात्मक विचार करणाऱ्यांना अॅग्जायटी अटॅकचा धोका असतो. कधीकधी मेंदूंच्या स्नायूंवर ताण आल्यामुळे हा अटॅक येण्याची शक्यता असते. सतत एखाद्या गोष्टीचा ताण घेतल्याने किंवा विचार केल्यास हा अटॅक येऊ शकतो. त्यामुळे स्वतःला नकारात्मकतेपासून दूर ठेवणं एकच एंग्जायटी अटॅकवर उपाय आहे.
अॅग्जायटीवर मात करण्यासाठी स्वतःला आवडत असलेल्या कामांमध्ये स्वतःला व्यस्त ठेवावं. ज्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. अॅग्जायटी अटॅक येईल असं वाटत असल्यास दिर्घ श्वास घ्या. स्वतःवर असलेला ताणतणाव सर्वात आधी कमी करण्याचा प्रयत्न करा. नियमित व्यायाम करा. कुटुंब व मित्रपरिवारासोबर वेळ व्यतीत करा. आता ‘बिग बॉस’च्या घरात पुढे काय होत हे पाहणं रंजक ठरणार आहे. त्याचबरोबर अंकिता व विकी यांचं भांडण आता पुढे कोणतं वळण घेईल हे पाहण्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून आहे.