लोकप्रिय टीव्ही अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणजे पर्ल वी पुरी. पर्ल सध्या ‘यारियां २’ या चित्रपटामुळे बराच चर्चेत आहे. या चित्रपटात तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. पण सध्या तो आणखी एका कारणामुळे चर्चेत आहे ते म्हणजे त्याला बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात होता. अलीकडेच त्याने याबाबत सिद्धार्थ काननला दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील त्या कठीण काळाबाबत वक्तव्य केलं. यावेळी त्याने तुरुंगात घालवलेल्या १४ दिवसांच्या त्रासदायक काळाबाबत खुलासा केला. या दिवसात त्याच्या मनात आत्महत्येचाही विचार आला होता. (Pearl wanted to commit suicide)
२०२१ मध्ये पर्लला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यात त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. या काळात त्याने त्याच्या आयुष्यातील सर्वात वाईट टप्प्याबाबत खुलासा केला. त्याने कसेबसे ते दिवस काढले होते. १० दिवसांनंतर त्याला तुरुंगात राहणं कठीण जाऊ लागलं. या सर्व परिस्थितीत त्याच्या मनात आत्महत्येचाही विचार आला होता. पण त्यानंतर त्याच्या मनात त्याच्या वडिलींचा विचार आला आणि आत्महत्येपासून त्याने स्वतःला रोखलं.
तुरुंगातील त्या दिवसांबद्दल बोलताना पर्ल म्हणाला, “मी रोज तुरुंगात मरत होतो. त्याबाबत मला नीट सांगताही येणार नाही. ११ दिवस माझ्याजवळ फक्त पेन होतं. या पेनाने आत्महत्या करता येते हे मी चित्रपटात पाहिलं होतं. मला माहित होतं की हे असं घडू शकतं. तो काळ असा होता की जेव्हा माझ्या वडीलांचं निधन झालं होतं. आईपण खूप आजारी होती. बाहेर तिची परिस्थिती कशी असेल याबद्दल मला काहीही माहित नव्हतं. यात मी काय करतो आहे हे ही मला कळत नव्हतं”. पर्ल पुढे सांगतो, “तुरुंगात असताना त्याने १०८ वेळा हनुमान चालीसा वाचली होती. यानंतरही परिस्थिती सधारत नसल्याने मी आत्महत्येचा विचार केला. पर्लकडे पेन होते कारण त्याने जेलरला तो लिहीत असल्याचं सांगितलं होतं. पण त्याचा खरा हेतू आत्महत्या करण्याचा होता. मात्र त्याच्या मनात वडिलांचा विचार आला आणि त्याने स्वतःला तसं करण्यापासून रोखलं”.
तो याबाबत पुढे सांगतो, “मी जेलच्या खिडकीजवळ होतो, तेव्हा मला वाटलं की माझे पप्पा खाली गुलाबी शर्ट घालून उभे आहेत. त्यावेळी ते जवळ असल्याच्या भावनेने मला धीर दिला आणि मी त्याच क्षणी आत्महत्येचा विचार सोडला. हा काळ माझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट काळ होता. अवघ्या काही महिन्यात मी स्वतःच्या आजीलाही गमावलं. वडिलांचं निधन होऊन अवघे १७ दिवस झाले होते आणि दुसरीकडे आईला कॅन्सर झाल्याचं कळलं. हा सगळा कठीण काळ माझ्यासाठी भयानक स्वप्नासारखा होता”. या सर्व गोष्टींमुळे पर्ल डिप्रेशनमध्ये गेला होता. त्या काळात परिस्थिती अशी बनली होती की त्याने स्वतःला २ महिने खोलीत कोंडून घेतलं होतं. पण त्याच्या आईने व मित्रपरिवाराच्या मदतीने त्याने स्वतःला सावरलं.