शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“एक माणूस समोरून आला अन्…”, प्रिया बापटने सांगितला तिच्याबरोबर घडलेला ‘तो’ धक्कादायक प्रकार, म्हणाली, “तेव्हापासून माझ्या मनात…”  

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 24, 2024 | 11:48 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Priya Bapat shared an incident where a person misbehaved with her see the details

“एक माणूस समोरून आला अन्...”, प्रिया बापटने सांगितला तिच्याबरोबर घडलेला ‘तो’ धक्कादायक प्रकार, म्हणाली, “तेव्हापासून माझ्या मनात...”

मुंबई, दिल्लीसह अन्य शहरात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच आहेत आणि देशाचे नागरीक म्हणून प्रत्येकासाठीच ही निंदनीय बाब आहे. देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत असताना आजही महिला कुठल्याही शहरात सुरक्षित नसल्याचे दिसून येते. वर्तमानपत्र, टीव्हीसारख्या अनेक माध्यमांत आजही महिला अत्याचार व त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीरच असल्याचे दिसून येते. या गोष्टी सर्वसामान्य महिलांसोबतच घडतात असे काही नाही. सिने इंडस्ट्रीत वावरणाऱ्या नावाजलेल्या अभिनेत्रींनासुद्धा बरेचदा अशा प्रकारांना सामोरे जावे लागते.  

अभिनेत्री प्रिया बापटने तिच्याबरोबर घडलेल्या अशाच एका गंभीर प्रकाराबद्दल सांगितले आहे. अभिनेत्री प्रिया बापटने मराठी नाटक, मालिका, चित्रपट तसेच वेब सीरिजच्या माध्यमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी प्रेक्षकांचेदेखील तिने भरभरून मनोरंजन केले आहे. आजवर तिने अनेक चित्रपट व वेबसीरिजच्या माध्यमातून सशक्त भूमिका साकारल्या आहेत. पण तिच्या आयुष्यात आहे एक भयंकर घटना घडली होती ज्याबद्दल तिने ‘Hauterr Fly’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.

View this post on Instagram

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

आणखी वाचा – “निसर्गसौंदर्याशी तडजोड करुन…”, केतकी माटेगांवकरची ‘ती पोस्ट चर्चेत, पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना विनंती करत म्हणाली, “यावर आपण मिळून… ”  

हा भयानक अनुभव सांगताना प्रियाने असं म्हटलं की, “मी शूट संपवून घरी येत होते. माझ्या हातात पिशव्या होत्या आणि मी फोनवर माझ्या एका मित्राबरोबर बोलत चालत होते. माझ्या कानाला फोन आणि हातात काही पिशव्या घेऊन जात होते. तेवढ्यात एक माणूस समोरून आला, त्याने माझे स्तन पकडले आणि तो पळून गेला. तेव्हा मला माझ्याबरोबर काय घडलं आहे हे समजायला मला तीन सेकंद लागले. तेव्हा मी फक्त तिथे स्तब्ध उभी होते. मला कळतच नव्हतं की नेमकं काय घडलं आहे. मी मागे वळून पाहिलं तर तो तिथे नव्हता. तो पळून गेला होता. अवघ्या काही क्षणात तो तिथून गायब झाला होता.”

आणखी वाचा – मराठी ‘बिग बॉस’ जिंकल्यानंतर शिव ठाकरेला २५ लाखपैकी फक्त इतकेच पैसे मिळाले, स्वत:च खुलासा करत म्हणाला, “आई-वडिलांच्या तिकीटाचे…”

यापुढे तिने असं म्हटलं की, “मी घरी गेले, दुर्दैवाने आई घरी नव्हती, बाबा होते. मला कळत नव्हतं की जे घडलं आहे ते बाबांना कसं सांगू. मी सारखी रडत होते, तेव्हा माझ्या बाबांनी विचारलं की काय झालं? मी त्यांना घडलेला प्रकार सांगितला. मी माझ्या बाबांकडे बघितलं तर त्या क्षणी ते खूप असहय्य वाटत होते. जे घडलं त्याचं त्यांना वाईट वाटत होतं आणि काय करावं हे त्यांना कळत नव्हतं. तेव्हापासून आजवर जर मला कुणाची नजरही वाईट असल्याचं जाणवलं की मला वाटतं ती व्यक्ती येऊन मला स्पर्श करेल, त्याआधी मी जाऊन त्याला पकडावं आणि मारावं. तेव्हाचा राग माझ्यात अजूनही आहे.”

Tags: marathi actressmarathi entertainment newspriya bapat
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bigg Boss fame Abhijeet Bichukale expressed his happiness on this occasion of he awarded with doctorate degree

“सातारा जिल्हा नकाशावर आणण्यात माझं योगदान...”, अभिजीत बिचुकलेंनी ‘डॉक्टरेट’ पदवी मिळताच व्यक्त केली भावना, म्हणाले, “माझ्यासाठी हा आनंदाचा क्षण...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.