शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“१८ वर्ष प्रेमात अन्…”, लग्नाच्या वाढदिवसानिमित्त उमेश कामतने बायकोला लिप किस करतानाचा फोटो केला शेअर, म्हणाला, “वेडेपणा…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 6, 2023 | 10:56 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Priya Bapat & Umesh Kamat Wedding Anniversary

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त उमेश कामतने बायकोला लिप किस करतानाचा फोटो केला शेअर

मनोरंजनसृष्टीत अशी अनेक कलाकार मंडळी आहेत, ज्यांनी आपल्या सह-कलाकाराची जोडीदार म्हणून निवड केली. अशीच एक जोडी आहे, जी प्रेक्षकांची लाडकी बनली. ती म्हणजे अभिनेत्री प्रिया बापट व अभिनेता उमेश कामत. मराठीतील एक क्युट जोडी म्हणून प्रिया व उमेश यांच्याकडे पाहिलं जातं. नाटक, मालिका व चित्रपटांमध्ये हे दोघं एकत्र दिसले असून या दोघांनीही त्यांच्या अभिनयाच्या कौशल्यावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या जोडीची ऑफस्क्रीन केमिस्ट्री जितकी त्यांच्या चाहत्यांना आवडते, तितकीच ती ऑनस्क्रीन पाहायला आवडते. (Priya Bapat & Umesh Kamat Wedding Anniversary)

दहा वर्षांपूर्वी प्रिया व उमेश यांनी ‘नवा गडी नवं राज्य’ हे नाटक केलं होतं. पण त्याआधी हे दोघं एकमेकांना डेट करत होते. अखेर २०११ मध्ये प्रिया व उमेश लग्नबंधनात अडकले. तेव्हापासून या दोघे कामाबरोबरच त्यांच्या आयुष्यातील अनेक सुंदर क्षण व्यतीत करताना दिसतात. अभिनयाबरोबरच ही जोडी त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर सक्रिय असतात. अनेकदा ते रिल्स, फोटोशूट करत चाहत्यांना भूरळ घालतात. आज या क्युट जोडीच्या लग्नाचा वाढदिवस. त्यानिमित्त उमेशने सोशल मीडियावर रोमँटिक फोटोज शेअर करत प्रियाला शुभेच्छा दिल्या, जे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

हे देखील वाचा – “रुग्णालयाच्या डीनला संडास साफ…”, नांदेडमधील ‘त्या’ घटनेवरुन केतकी चितळेची वादग्रस्त पोस्ट, म्हणाली, “जात बघून…”

सध्या प्रिया व उमेश यांचं ‘जर तर ची गोष्ट’ हे नाटक रंगभूमीवर सुरु असून या नाटकाच्या दौऱ्यानिमित्ताने ते दोघे ऑस्ट्रेलियाला गेले आहेत. प्रिया व उमेशच्या लग्नाला १२ वर्ष पूर्ण झाली असून ते हा वाढदिवस ऑस्ट्रेलियात साजरा करत आहे. यानिमित्त उमेशने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटोज शेअर केले. ज्यामध्ये ही जोडी खूपच सुंदर दिसत आहे. पहिल्या फोटोत तो प्रियाला लिप किस करताना दिसला. तर दुसऱ्या फोटोत एकमेकांना मिठीत घेऊन पोज देत आहेत. हे फोटोज शेअर करताना उमेश म्हणाला, “१८ वर्ष प्रेमात आणि १२ वर्ष संसारात! हा सुंदर वेडेपणा कायम राहो, तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा”. त्यांच्या या पोस्टवर मराठी सृष्टीतील अनेक कलाकार मंडळी व चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहे.

हे देखील वाचा – Video: प्रार्थना बेहरने सोडली मुंबई, ‘या’ ठिकाणी बांधलं आलिशान घर, तिथेच स्थायिक झाली अभिनेत्री, म्हणाली, “मुंबई सोडून…”

View this post on Instagram

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat)

प्रिया व उमेश गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन विश्वात सक्रिय आहेत. प्रियाने मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टीत आपली ओळख निर्माण केली आहे. त्याचबरोबर, ती नाट्यनिर्मिती क्षेत्रातसुद्धा सक्रिय आहे. गेल्या काही वर्षांपासून हे दोघे मोठ्या पडद्यावर दिसले नसून चाहते या जोडीला पाहण्यासाठी प्रचंड आतुरलेले आहेत.

Tags: priya bapatPriya Bapat & Umesh Kamat Wedding Anniversarypriya umeshumesh kamat
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Boyz 4 trailer out

Video: बोल्ड संवाद, कॉमेडी अन्…; 'बॉईज ४'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, गौरव मोरेचा लूक पाहून सर्वत्र होतंय कौतुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.