Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’ या रिऍलिटी शोमध्ये अंकिता लोखंडेने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. विकी जैन व अंकिता लोखंडे यांच्यात ‘बिग बॉस’च्या घरात आल्यापासून भांडण सुरु असलेली पाहायला मिळत आहे. त्यांच्या नात्यात खूप मोठी फूट पडली असल्याचं समोर आलं आहे. यावेळी बोलताना अंकिताने त्याच्या पूर्वीच्या नात्यात फसवणूक झाल्याचे संकेत देत भाष्य केलं. समोर आलेल्या नव्या भागात, मुन्नवर फारुकी याने विश्वासघात केल्याचा आरोप करत आयशा खान रडताना दिसत आहे. यावेळी तिने नाझीलाबरोबर डेट करताना तिच्याशीही संपर्क साधला असल्याचं सांगितलं.
आयशा अंकिताला म्हणाली, “या सगळ्यात माझा काय दोष होता? मी कधीच त्याचं किंवा कोणाचंही वाईट केलं नाही. जर तो नाझिलाबरोबर रिलेशनशिपमध्ये असेल आणि तिच्याशी नातं सुरु ठेवायचं असेल तर त्याने माझ्याशी संपर्क साधायला नको होता. मला काहीच कळत नाही आहे. माझं मन दुखावलं आहे. मी फक्त त्याच्यामुळे शांत होते पण आता मी शांत राहू शकणार नाही” असं ती अंकिताशी बोलताना दिसली.
यावर अंकिता आयशाची समजूत काढताना दिसली. अंकिता म्हणाली, तिच्याही आयुष्यात अशीच परिस्थिती होती. अंकिता म्हणाली, “मी हे सर्व समजू शकते. मला कळत आहे की, तू कोणत्या गोष्टीतून जात आहेस. मी पण या सगळ्याचा सामना केला आहे”. अंकिताने याबाबत अधिक माहिती दिली नसली तरी, अंकिता दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसह रिलेशनशिपमध्ये होती. २०१६ मध्ये वेगळे होण्यापूर्वी दोघांनी जवळपास सात वर्षे एकमेकांना डेट केले होते.
याआधी सुशांतबरोबरच्या ब्रेकअपबद्दल बोलताना अंकिताने शोमध्ये मुन्नवरला सांगितले होते की, “तो एका रात्रीत गायब झाला. जेव्हा त्याला प्रसिद्धी, यश मिळत होते तेव्हा लोक त्याचे कान भरत होते”. सुशांतने तिला कधीही त्यांच्या ब्रेकअपचे कोणतेही कारण दिले नाही, असंही अंकिता म्हणाली.