आमिर खानची लेक आयरा खानने नुपूर शिखरेबरोबर काल, (बुधवार १० जानेवारी) रोजी ख्रिश्चन पद्धतीने लग्नगाठ बांधली. याआधी ३ जानेवारीला नोंदणी पद्धतीने आयरा-नुपूर यांचं लग्न झालं होतं. त्यानंतर या दोघांचे उदयपूरमध्ये ख्रिश्चन पद्धतीने शाही लग्न पार पडले आहे. या शाही लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटो व व्हिडीओमध्ये आयरा-नुपूर एकमेकांचा हात पकडून लग्नासाठी येत असतानाचा व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Aamir Khan Emotional In Daughter Wedding)
आयरा खान व नुपूर शिखरेने लग्नासाठी खास ख्रिश्चन स्टाइल आउटफिट परिधान केला होता. आयराने पांढऱ्या रंगाचा गाउन घातला होता. तर नुपूरने बेज रंगाचा कोर्ट-पॅन्ट असा फॉर्मल सूट परिधान केला होता. या व्हायरल फोटोमध्ये दोघं खूप सुंदर दिसत होते. अशातच आयरा व नुपूरच्या या ख्रिश्चन लग्नातील सध्या एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये आमिर खान लेकीला लग्नबंधनात अडकताना पाहून भावुक झालेला दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आयरा व नुपूर एकमेकांना किस करून अंगठी घालताना दिसत आहे आणि आपल्या लेकीला लग्नबंधनात अडकताना पाहून आमिर भावुक झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. लेकीला विवाहबंधनात अडकताना पाहून आमिर डोळ्यावरचा चष्मा काढून रुमालाने डोळे पुसताना दिसत आहे. आमिरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
या व्हायरल व्हिडीओला नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी आयरा-नुपूर या नवविवाहित दाम्पत्याला लग्नानिमित्त शुभेच्छाहे दिल्या आहेत. दरम्यान, आयरा-नुपूर शिखरे यांचं लग्न पार पडल्यानंतर आता जियो वर्ल्ड सेंटरमध्ये त्यांचे ग्रँड रिसेप्शन पार पडणार आहे. या ग्रँड रिसेप्शनला बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. येत्या १३ जानेवारी रोजी त्यांचं हे रिसेप्शन होणार असल्याचे म्हटले जात आहे.