गुरूवार, जून 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“वाटलं नव्हतं असा दिवस येईल”, लॉस एंजेलिसमध्ये लागलेली आग पाहून घाबरली प्रिती झिंटा, सांगितली कशी आहे परिस्थिती?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 12, 2025 | 5:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Preity Zinta Emotional

लॉस एंजेलिसमध्ये लागलेली आग पाहून घाबरली प्रिती झिंटा, सांगितली कशी आहे परिस्थिती?

Preity Zinta Emotional : लॉस एंजेलिसमधील भीषण आगीदरम्यान बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने स्वतःच्या आणि तिच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेच्या स्थितीबद्दल माहिती दिली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री प्रीती झिंटा लग्नानंतर चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. २०१६ मध्ये जीन गुडइनफशी लग्न केल्यानंतर, ती भारत आणि लॉस एंजेलिस असा प्रवास करते. अलीकडेच, तिने इंस्टाग्रामवर तिच्या चाहत्यांना आश्वासन दिले की, ती शहराला वेढलेल्या मोठ्या जंगलातील आगीपासून सुरक्षित आहे. या संकटाच्या काळात, प्रीतीने तिची आणि तिथे राहणाऱ्या इतरांची कठीण परिस्थिती सोशल मीडियावर शेअर केली.

प्रीती झिंटाने X वर लिहिले, “मी कधीच कल्पना केली नव्हती की असा दिवस येईल. जेव्हा आग आपल्या आजूबाजूचा परिसर नष्ट करेल. आपले मित्र आणि कुटुंबियांना बाहेर काढले जाईल किंवा त्यांना हाय अलर्टवर ठेवण्यात येईल. धुराने भरलेल्या आकाशातून राख बर्फासारखी पडेल”.

आणखी वाचा – अर्चना पूरण सिंहच्या मड आयलंड बंगल्यात नवऱ्यासह पोहोचली भारती सिंग, भव्यता पाहून दोघेही झाले थक्क

I never thought I would live to see a day where fires would ravage neighbourhoods around us in La, friends & families either evacuated or put on high alert, ash descending from smoggy skies like snow & fear & uncertainty about what will happen if the wind does not calm down with…

— Preity G Zinta (@realpreityzinta) January 11, 2025

प्रीतीने पुढे म्हटलंय, “जर वारा शांत झाला नाही तर काय होईल याबद्दल इतकी भीती आणि अनिश्चितता असेल असे कधीच वाटले नव्हते, कारण आमच्याबरोबर लहान मुले आणि आजी आजोबा आहेत. ही विध्वंसता पाहून मला वाईट वाटते आणि मी देवाचे आभार की आम्ही आता सुरक्षित आहोत”. त्यांनी पुढे लिहिले, “या आगीत जे विस्थापित झाले आहेत आणि ज्यांनी सर्वस्व गमावले आहे त्यांच्याबरोबर माझे विचार आणि प्रार्थना आहेत. आशा आहे की वारे लवकरच शांत होतील आणि आग आटोक्यात येईल. अग्निशमन विभाग, खूप खूप धन्यवाद. अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि जीव-मालमत्ता वाचवणारे सर्वजण सुरक्षित रहा”.

आणखी वाचा – ‘तारक मेहता…’ फेम गुरुचरण सिंहवर इतक्या कोटींचे कर्ज, हॉस्पिटलमध्ये उपचारही सुरु, जवळच्या मैत्रिणीचा खुलासा

प्रीती व्यतिरिक्त, आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही लॉस एंजेलिसमधील आगीबद्दल चिंता व्यक्त केली. प्रियांका तिचा पती निक जोनास आणि मुलगी मालती मेरी जोनासबरोबर लॉस एंजेलिसमध्ये राहते. तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले, “मला आशा आहे की आपण सर्वजण आज रात्री सुरक्षित राहू”. प्रियांकाने अग्निशमन दलाचे आभार मानले आणि आगीच्या दृश्याचा फोटो शेअर केला. तिने तिच्या घरातून ही आग पाहिली.

Tags: bollywood newsPreity Zinta EmotionalPreity Zinta post
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Ankita Walawalkar Kunal Bhagat Ukhana

“वालावलकरांची पोरगी पटवली…”, अंकिता वालावलकरसाठी नवऱ्याचा हटके उखाणा, केळवण स्पेशल व्हिडीओ समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.