Ankita Walawalkar Kunal Bhagat Ukhana : सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे ती म्हणजे कोकणहार्टेड गर्ल अंकिता वालावलकर हिच्या लग्नाची. अंकिताची सध्या लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वापासून अंकिता घराघरांत लोकप्रिय झाली. ‘बिग बॉस मराठी’ मध्ये अंकिताने अक्षरशः धुमाकूळ घातला. घराबाहेर पडल्यानंतरही अंकिता बरेचदा चर्चेत असलेली पाहायला मिळाली. ‘बिग बॉस’च्या घरात असताना अंकिताच्या लग्नाचीही बरेचदा चर्चा झाली होती. मात्र, ‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्यानंतर अंकिताने सोशल मीडियाद्वारे प्रेमाची जाहीर कबुली दिली. अंकिताच्या लग्नासाठी तिचे सगळेच चाहते उत्सुक आहेत. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अंकिताने कुणाल भगतसह रिलेशनमध्ये असल्याचं कबूल केलं.
अखेर आता अंकिताची लगीनघाई सुरु झाली आहे. अंकिताने तिच्या पहिल्या केळवणाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. अंकिताच्या केळवणासाठी तिच्या कुटुंबीयांनी आकर्षक सजावट केलेली या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतेय. ‘घरचं पहिलं केळवण’ असं म्हणत अंकिताने हा व्हिडीओ शेअर केला आहे . अंकिता व कुणाल यांच्या नावाच्या रांगोळ्या काढून जेवणाच्या ताटाच्या बाजूला फुलांची सजावट करण्यात आली होती. यानंतर या जोडप्याचं औक्षण करण्यात आलं.
आणखी वाचा – ‘तारक मेहता…’ फेम गुरुचरण सिंहवर इतक्या कोटींचे कर्ज, हॉस्पिटलमध्ये उपचारही सुरु, जवळच्या मैत्रिणीचा खुलासा
जेवणासाठी खास शाकाहारी बेत करण्यात आला होता. मोदक, बासुंदी, भाजी-चपाती, पुलाव असा मेन्यू यावेळी होता. अंकिता व कुणालने एकमेकांना मोदक भरवत घेतलेले उखाणे लक्षवेधी ठरले. यावेळी अंकिता उखाणा घेत म्हणाली, “समोर आहे बासुंदी खायची झालीये मला घाई, कुणालचं नाव घेते सुरु झाली लगीनघाई”. तर कुणालने उखाणा घेत म्हटलं की, “पाटावर पाट, पाटाखाली भुंगा, वालावलकरांची पोरगी पटवली ढांगचिकढींगा”, असं म्हटलं.
आणखी वाचा – कोकणहार्टेड गर्लची लगीनघाई! अंकिता वालावलकर व कुणाल भगतचं साग्रसंगीत केळवण, पहिला फोटो समोर
अंकिताच्या या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अंकिताच्या नवऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, तो मराठी संगीत दिग्दर्शक म्हणून सिनेविश्वात कार्यरत आहे. सध्या कुणाल अनेक मराठी मालिकांच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी पेलवतना दिसत आहे.