Gurucharan Singh News : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेता गुरचरण सिंगची प्रकृती अत्यंत वाईट असल्याचं समोर आलं आहे. एकीकडे तो सध्या रुग्णालयात दाखल असताना दुसरीकडे कर्जाच्या ओझ्यानेही खचला आहे. सिंह यांची जवळची मैत्रीण भक्ती सोनी हिने गुरुचरण यांच्यावर करोडोंचे कर्ज असल्याचा खुलासा केला आहे. सिंह यांच्या कुटुंबासह कोणीही त्यांना या कठीण काळात मदत करत नसल्याचा दावाही त्यांनी केला. सिंग यांची जवळची मैत्रीण भक्ती सोनी हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत गुरुचरण सिंग यांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल भाष्य केले आहे. अभिनेत्याने स्वत: हॉस्पिटलमधून एक व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचे नेमके कारण त्यांनी सांगितले नाही. पण त्याची अवस्था पाहून चाहते काळजीत पडले आहेत. अनेकजण त्याच्या तब्येतीबाबत विचारणा करत आहे.
अभिनेत्याच्या मैत्रिणीने Etimes ला दिलेल्या मुलाखतीत त्याच्यावरील कर्जाबाबत खुलासा केला. भक्ती सोनी म्हणाली की, “त्याच्यावर सुमारे १.२ कोटी रुपयांचे कर्ज होते. मात्र, त्यांच्या वडिलांकडे ५५ कोटींची संपत्ती आहे. परंतु दुर्दैवाने, भाडेकरु मालमत्ता रिकामी करत नसल्याने वाद सुरु आहे. प्रकरण मिटले आणि मालमत्ता विकता आली तर ते कर्ज फेडू शकतील”. सिंगच्या मैत्रीनीने पुढे दावा केला की अभिनेत्याने आपली सर्व बचत संपवली आहे आणि ते म्हणाले, “जेव्हा त्याला सर्वात जास्त आधाराची गरज असते, तेव्हा त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह कोणीही त्याला मदत करत नाही. माझ्यासारखे मित्र आणि दिल्लीतील मित्रच त्याला आर्थिक पाठबळ देत आहेत”.
जुलै २०२४ मध्ये गुरुचरण सिंह यांनी आर्थिक संघर्षाचा सामना केल्याची कबुली दिली होती. ‘बॉम्बे टाईम्स’शी बोलताना त्यांनी सांगितले की २०२० मध्ये कोरोनाव्हायरस साथीच्या आजाराच्या वेळी त्यांनी मुंबई सोडली आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. तथापि,विविध कारणांमुळे तो व्यवसाय करु शकला नाही, ज्यामुळे त्याला खूप आर्थिक संघर्षांचा सामना करावा लागला आणि तो खूप अस्वस्थ होता.
आणखी वाचा – कोकणहार्टेड गर्लची लगीनघाई! अंकिता वालावलकर व कुणाल भगतचं साग्रसंगीत केळवण, पहिला फोटो समोर
अभिनेत्याने असं म्हटलं होतं की, “मी इंडस्ट्रीतील लोकांना मला सपोर्ट करायला सांगत आहे. मी परत आलो आहे आणि मला खूप काम करायचे आहे. मलाही माझ्याकडे असलेली सर्व कर्जे एक एक करुन फेडायची आहेत, हे माझ्या कामातून होऊ शकते आणि मी कठोर परिश्रम करण्यास तयार आहे”. ५१ वर्षीय अभिनेत्याने सांगितले होते, “मला हे समजले आहे की, मी माझ्या जीवनातील इतर जबाबदाऱ्या पार पाडत असतानाही माझा आध्यात्मिक प्रवास सुरु ठेवू शकतो”.