Bharti Singh Shocked To See Archana Puran Singh Bunglow : अर्चना पूरण सिंह यांचा मड आयलंड बंगला बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. कुठलाही सेलिब्रिटी अर्चनाला भेटला किंवा कपिलच्या शोमध्ये आला तर तो तिच्या बंगल्याबद्दल बोलताना दिसतोय. कपिल शर्मादेखील अर्चनाच्या बंगल्याची स्तुती करताना आणि ती खूप श्रीमंत आहे, आलिशान बंगल्यात राहते असा टोमणा मारताना दिसला आहे. अर्चनाने इंस्टाग्रामवर अनेक व्हिडीओही शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिच्या बंगल्याची झलक पाहायला मिळालीय. मात्र अलीकडेच भारती सिंह मुलगा गोला आणि पती हर्ष लिंबाचियाबरोबर अर्चनाच्या बंगल्यावर पोहोचली. यावेळी बंगल्याच्या आतील दृश्य आणि भव्य शैली पाहून ते आश्चर्यचकित झाले. अर्चना पुरण सिंहचा बंगला पाहून हर्ष लिंबाचियाचे डोळेच दिपले असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
भारती आधीच अर्चनाच्या घरी गेली होती, पण मुलगा गोला आणि पती हर्ष लिंबाचिया यांच्याबरोबर पहिल्यांदाच ती तिच्या घरी गेली. अर्चना व भारती ‘कॉमेडी सर्कस’च्या दिवसांपासून एकमेकांना ओळखतात आणि दोघांचेही घट्ट नाते आहे. अर्चनाचा बंगला पाहून भारती म्हणाली, “अर्चना मॅडम खूप श्रीमंत निघाल्या”. अर्चनाने गोलाला आपल्या मांडीवर घेतल्यानंतर तिने विचारले, “हे कोणाचे घर आहे?”. तर भारतीने उत्तर दिले, “हे कपिल शर्मा शोच्या मालकिणीचे घर आहे”.अर्चना पूरण सिंग आणि परमीत सेठी यांनी भारती सिंग आणि कुटुंबीयांचे स्वागत केले. यावेळी नाश्ता व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांनी भारती व हर्षबरोबर बसून खूप गप्पा मारल्या आणि मनोरंजक गोष्टी शेअर केल्या.
आणखी वाचा – कोकणहार्टेड गर्लची लगीनघाई! अंकिता वालावलकर व कुणाल भगतचं साग्रसंगीत केळवण, पहिला फोटो समोर

दरम्यान, अर्चना व परमीतने भारती-हर्ष यांना लग्नाची गोष्ट सांगितली. अर्चनाने सांगितले की, लग्नापूर्वी ती आणि परमीत चार वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. ती म्हणाली, “चार वर्षे एकमेकांबरोबर राहिलो, एकत्र फिरलो. त्याच्या कुटुंबीयांनाही याची माहिती नाही. आम्ही एक गुप्त लग्न केले होते. घराच्या गच्चीवर लग्न केले. घटस्फोट घेण्यापेक्षा आधी एकत्र राहणे चांगले”.
अर्चनाची दोन मुले आर्यमन व आयुष्मान यांनी गोलासाठी भेटवस्तू आणल्या. भारती राष्ट्रीय स्तरावरील तिरंदाजी आणि रायफल नेमबाज असल्याचे त्यांना समजल्यावर त्यांनी तिच्यासाठी तिरंदाजीचा सेटही आणला. यानंतर त्यांनी बागेत भारतीची परीक्षाही घेतली. आर्यमन व आयुष्मानने वडील परमीतच्या एका मजेदार सवयीचा खुलासा केला. ते म्हणाले की, “पापा ‘तुझा मुलगा, माझा मुलगा’ म्हणत राहतात. काही चांगलं झालं तर ते म्हणतात, ‘हा माझा मुलगा आहे’ आणि काही वाईट झालं तर ते म्हणतात, ‘हा तुझा मुलगा आहे”.