अभिनेता प्रथमेश परब व त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरचा नुकताच साखरपुडा समारंभ संपन्न झाला. ‘व्हॅलेंटाईन डे’चे औचित्य साधत या लोकप्रिय कपलने साखरपुडा सोहळा उरकला. नुकतीच त्यांच्या रिलेशनशिपला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. लवकरच आता ही जोडी विवाहबंधनात अडकणार असल्याचंही समोर आलं आहे. दरम्यान, प्रथमेश व क्षितिजा यांच्या साखरपुडा सोहळ्यातील अनेक व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहेत. यावेळी दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहताना पाहायला मिळत आहे. (Prathamesh Parab Engagemet)
प्रथमेश व क्षितिजा यांचा शाही थाटामाटात साखरपुडा सोहळा संपन्न झाला. यावेळी दोघांच्या साधेपणाने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. प्रथमेश व क्षितिजा दोघांचा पारंपरिक व साधा लूकही साऱ्यांना विशेष भावला. प्रथमेश त्याच्या साखरपुड्यात खूप खुश असल्याचं पाहायला मिळालं. साखरपुड्यात प्रथमेशने केलेला डान्सही साऱ्यांच्या पसंतीस पडला. यांत अभिनेत्याने शाहरुख खानच्या गाण्यावर ठेका धरत हटके स्टेप्स केल्या. यावेळी क्षितिजानेही प्रथमेशला साथ दिलेली पाहायला मिळाली.
याशिवाय लेकाच्या साखरपुड्यात त्याच्या आई-वडिलांचाही हटके स्वॅग पहायला मिळाला. प्रथमेशसह यावेळी त्याच्या आई-वडिलांनीही ठेका धरलेला पाहायला मिळाला. आई-वडिलांसह नाचतानाची फ्रेम खूपच सुंदर दिसत होती. लेकाच्या साखरपुडयासाठी प्रथमेशचे आई-वडील खूप खुश दिसत होते. यावेळी नाचताना त्यांच्या सुनेनेही सासू-सासऱ्यांना साथ दिलेली पाहायला मिळाली. एकूणच परब फॅमिलीचा हा हटके डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.
‘टाईमपास’ चित्रपटातील ‘ही पोळी साजूक तुपातली’ या गाण्यावर परब कुटुंबीय थिरकताना दिसले. त्यांचा हा व्हिडीओ तुफान धुमाकूळ घालत आहे. प्रथमेश परबच्या साखरपुड्याला सिनेसृष्टीतील कलाकार मंडळीही उपस्थित होते. त्यांनीदेखील प्रथमेशसह ठेका धरलेला पाहायला मिळाला. प्रथमेश व क्षितिजा यांच्या साखरपुड्याच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर, साखरपुड्यासाठी अभिनेत्याने पांढऱ्या रंगाची शेरवानी, तर क्षितिजाने जांभळ्या रंगाची सुंदर अशी साडी नेसली होती. दोघांचाही साधा सिंपल लूक प्रेक्षकांना विशेष भावला.