बॉलिवूड सिनेसृष्टीतील कपल नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. यापैकी एका लोकप्रिय कपाळाची नेहमीच चर्चा रंगलेली असते. ही सेलिब्रिटी जोडी म्हणजे अनुष्का शर्मा व विराट कोहली. अनुष्का व विराट एका वयक्तिक कारणामुळे चर्चेत आले आहेत. हे जोडपं लवकरच दुसऱ्या बाळाला जन्म देणार असल्याची काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. अभिनेत्रीच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीबाबत सातत्याने बातम्या येत आहेत. मात्र अद्याप या जोडप्याने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. या सगळ्यात आता सोशल मीडियावरुन एक संकेत मिळाला आहे. हे जोडपे त्यांच्या दुस-या बाळाला भारतात नव्हे तर परदेशात जन्म देणार असल्याचं समोर आलं आहे. (Anusha Sharma Pregnancy)
उद्योगपती हर्ष गोएंका यांनी अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. यामुळे अनुष्का शर्माच्या प्रेग्नेंसीबाबत चर्चांना उधाण आलं आहे. हर्ष गोएंका यांनी त्यांच्या X अकाऊंटवर एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये त्यांनी असे लिहिले आहे की, “अवघ्या काही दिवसात बाळाचा जन्म होणार आहे. आता हे बाळ वडिलांसारखं क्रिकेटर बनणार की आईप्रमाणे चित्रपटांमध्ये करिअर करणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे”. त्यांच्या या पोस्टने साऱ्यांना संभ्रमात टाकलं आहे.
याचबरोबर या बाळाचा जन्म लंडनमध्ये होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. हर्ष गोएंका यांच्या या पोस्टने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. २०२० मध्ये विराट कोहलीने अनुष्काच्या गरोदरपणाची बातमी सोशल मीडियावर दिली होती. जानेवारी २०२१ मध्ये अनुष्काने एका मुलीला जन्म दिला जिचे नाव वामिका कोहली असे आहे. मात्र, या जोडप्याने अद्याप मीडियासमोर मुलीचा चेहरा उघड केलेला नाही. दोघांनाही त्यांचे वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवायचे असल्याचं त्यांनी बरेचदा सांगितलं आहे.
A new baby is to be born in the next few days! Hope the baby takes India to great heights like the greatest cricketing father. Or will it follow the mother and be a film star? #MadeInIndia #ToBeBornInLondon
— Harsh Goenka (@hvgoenka) February 13, 2024
अनुष्का शर्माच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री लवकरच ‘चकडा एक्सप्रेस’ या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटात दिसणार आहे. अभिनेत्रीने चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. चाहते तिच्या या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.