अभिनेते प्रकाश राज यांनी आजवर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडमध्येही केलेलं काम उल्लेखनीय आहे. त्यांच्या अभिनयाचे आज लाखो चाहते आहेत. प्रकाश राज कामाव्यतिरिक्त त्यांनी केलेल्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आताही त्यांनी केलेलं ट्वीट चर्चेचा विषय ठरत आहे. चांद्रयान ३च्या लँडिंगपूर्वी प्रकाश राज यांनी केलेलं ट्वीट पाहून नेटकऱ्यांचा संताप झाला आहे. तसेच त्यांनी या महत्त्वपूर्ण मोहिमेची व इस्त्रोचे माजी प्रमुख के सिवन यांची खिल्ली उडवली आहे.
भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी होण्यासाठी कित्येकजण आज प्रयत्न करत आहेत. शिवाय देशभरातील लोकांचं या मोहिमेकडे लक्ष लागून राहिलं आहे. असं असताना मात्र प्रकाश राज यांनी केलेलं ट्वीट चीड आणून देणारं आहे. त्यांनी कार्टुन स्वरुपात के सिवन यांचा एक फोटो ट्वीट केला. या फोटोमध्ये ते चहा ओतताना दिसत आहेत.
आणखी वाचा – “मराठी कलाकारांबरोबर काम करणं कठीण कारण…”, ‘ताली’वरुन सुष्मिता सेनचं भाष्य, म्हणाली, “ते सगळे कलाकार…”
के सिवन यांचं हे व्यंगचित्र शेअर करताना विक्रम लँडरकडून पहिला फोटो वॉव असं त्यांनी ट्वीट केलं. अशाप्रकारचा फोटो शेअर करुन त्यांनी भारताची ही ऐतिहासिक मोहीम व के सिवन यांची खिल्ली उडवली. त्यांचं हे ट्वीट पाहून अनेकांचा राग अनावर झाला. या ट्वीटवर नेटकऱ्यांनी व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे. तर अनेकजण प्रकाश राज यांचं हे ट्वीट करण्यामागचं उद्देश काय? असं विचारत आहेत.
ತಾಜಾ ಸುದ್ದಿ :~
— Prakash Raj (@prakashraaj) August 20, 2023
ಚಂದ್ರಯಾನದಿಂದ ಈಗಷ್ಟೇ ಬಂದ ಮೊದಲ ದ್ರಶ್ಯ .. #VikramLander #justasking pic.twitter.com/EWHcQxc1jA
भारतातील वाईट गोष्टींचं प्रतिनिधित्व प्रकाश राज करतात, प्रकाश राज या सगळ्यांना प्रोत्साहन देत नसून टीका करत आहेत अशा विविध कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. याआधीही त्यांनी अनेक विषयांवर ट्वीट करत वादाला तोंड फोडलं. आताही त्यांनी केलेल्या ट्वीटमुळे प्रकाश राज यांना ट्रोल करण्यात येत आहे.