रविवार, एप्रिल 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

देशाला अभिमान असताना प्रकाश राज यांनी चांद्रयान मोहिमेची उडवली खिल्ली, के सिवन यांचा ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाले…

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 21, 2023 | 7:15 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Prakash raj tweet on chandrayaan

देशाला अभिमान असताना प्रकाश राज यांनी चांद्रयान मोहिमेची उडवली खिल्ली, के सिवन यांचा ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाले...

अभिनेते प्रकाश राज यांनी आजवर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडमध्येही केलेलं काम उल्लेखनीय आहे. त्यांच्या अभिनयाचे आज लाखो चाहते आहेत. प्रकाश राज कामाव्यतिरिक्त त्यांनी केलेल्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आताही त्यांनी केलेलं ट्वीट चर्चेचा विषय ठरत आहे. चांद्रयान ३च्या लँडिंगपूर्वी प्रकाश राज यांनी केलेलं ट्वीट पाहून नेटकऱ्यांचा संताप झाला आहे. तसेच त्यांनी या महत्त्वपूर्ण मोहिमेची व इस्त्रोचे माजी प्रमुख के सिवन यांची खिल्ली उडवली आहे.

भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी होण्यासाठी कित्येकजण आज प्रयत्न करत आहेत. शिवाय देशभरातील लोकांचं या मोहिमेकडे लक्ष लागून राहिलं आहे. असं असताना मात्र प्रकाश राज यांनी केलेलं ट्वीट चीड आणून देणारं आहे. त्यांनी कार्टुन स्वरुपात के सिवन यांचा एक फोटो ट्वीट केला. या फोटोमध्ये ते चहा ओतताना दिसत आहेत.

आणखी वाचा – “मराठी कलाकारांबरोबर काम करणं कठीण कारण…”, ‘ताली’वरुन सुष्मिता सेनचं भाष्य, म्हणाली, “ते सगळे कलाकार…”

के सिवन यांचं हे व्यंगचित्र शेअर करताना विक्रम लँडरकडून पहिला फोटो वॉव असं त्यांनी ट्वीट केलं. अशाप्रकारचा फोटो शेअर करुन त्यांनी भारताची ही ऐतिहासिक मोहीम व के सिवन यांची खिल्ली उडवली. त्यांचं हे ट्वीट पाहून अनेकांचा राग अनावर झाला. या ट्वीटवर नेटकऱ्यांनी व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे. तर अनेकजण प्रकाश राज यांचं हे ट्वीट करण्यामागचं उद्देश काय? असं विचारत आहेत.

आणखी वाचा – “याच्या केसांना धक्का कोणी लावला?”, गौरव मोरेने  केस कापल्यानंतर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट, समीर चौघुले म्हणाले, “हास्यजत्रेत…”  

ತಾಜಾ ಸುದ್ದಿ :~

ಚಂದ್ರಯಾನದಿಂದ ಈಗಷ್ಟೇ ಬಂದ ಮೊದಲ ದ್ರಶ್ಯ .. #VikramLander #justasking pic.twitter.com/EWHcQxc1jA

— Prakash Raj (@prakashraaj) August 20, 2023

भारतातील वाईट गोष्टींचं प्रतिनिधित्व प्रकाश राज करतात, प्रकाश राज या सगळ्यांना प्रोत्साहन देत नसून टीका करत आहेत अशा विविध कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. याआधीही त्यांनी अनेक विषयांवर ट्वीट करत वादाला तोंड फोडलं. आताही त्यांनी केलेल्या ट्वीटमुळे प्रकाश राज यांना ट्रोल करण्यात येत आहे.

Tags: bollywood actorentertainment newsindian actor
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Raj Sharma Passes Away
Entertainment

प्रसिद्ध कॉमेडियनचे वयाच्या ५०व्या वर्षी निधन, बऱ्याच दिवसांपासून होते रुग्णालयात, मृत्यूचे कारण अस्पष्ट

एप्रिल 25, 2026 | 1:12 pm
Biplab Dasgupta death
Entertainment

वयाच्या ७५व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, रुग्णालयात नेतानाच वाटेत मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा

एप्रिल 25, 2026 | 11:58 am
anupam kher sold mumbai home
Entertainment

भाड्याने राहायला सुप्रसिद्ध अभिनेत्याने विकलं घर, २२ वर्षात आलिया भट्टने घेतल्या अभिनेत्याच्या दोन्ही मालमत्ता, किंमत…

एप्रिल 25, 2026 | 10:18 am
Nehha Pendse tv shows
Entertainment

“त्याने मला अचानक पकडलं”, मुंबईच्या भररस्त्यात अभिनेत्रीसह घडलं असं काही की…; म्हणाली, “जवळ जाऊन…”

एप्रिल 25, 2026 | 9:57 am
Next Post
Sunny Deol House Auction

५६ कोटींचं कर्ज आणि घराचा लिलाव होणार असल्याच्या चर्चांवर अखेर सनी देओलने सोडलं मौन, म्हणाला, "या प्रकरणावर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.