सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नाआधी नवऱ्यासह देवदर्शनामध्ये रमली प्राजक्ता गायकवाड, थेट पंढरपुरात जात विठुरायाचं घेतलं दर्शन, फोटोंनी वेधलं लक्ष

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 19, 2025 | 6:29 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
prajakta gaikwad pandharpur photo

लग्नाआधी नवऱ्यासह देवदर्शनामध्ये रमली प्राजक्ता गायकवाड, थेट पंढरपुरात जात विठुरायाचं घेतलं दर्शन, फोटोंनी वेधलं लक्ष

prajakta gaikwad pandharpur photo : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजेच प्राजक्ता गायकवाड. या ऐतिहासिक मालिकेतून प्राजक्ताने साकारलेल्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या मालिकेत तिने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली होती. याशिवाय ‘नांदा सौख्यभरे’, ‘संत तुकाराम’, ‘आई माझी काळुबाई’ या मालिकांमध्ये ही प्राजक्तानं महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. सोशल मीडियावर ही प्राजक्ताचा बऱ्यापैकी वावर असलेला पाहायला मिळतो. नेहमीच काहीना काही शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच काही दिवसांपूर्वी प्राजक्तानं लवकरच ती लग्न बंधनात अडकणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली.;

पाहुणे मंडळींच्या कुंकवाच्या कार्यक्रमाचे फोटो असे कॅप्शन देत प्राजक्ताने लग्न ठरल्याची गुडन्यूज दिली. त्यामुळे प्राजक्ताचा होणारा नवरा कोण आहे याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. मात्र यावेळी प्राजक्ताने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा फोटो काही दाखवला नाही. त्यानंतर थेट साखरपुड्याच्या दिवशी प्राजक्ताने तिच्या नवऱ्याबरोबरचा फोटो शेअर करत साखरपुडा झाल्याची गुडन्यूज दिली. ७ ऑगस्ट 2025 रोजी प्राजक्ताचा अगदी थाटामाटात साखरपुडा समारंभ पार पडला. प्राजक्ताच्या होणाऱ्या पतीचे नाव शंभूराज आहे. मालिकेतही छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नीचीच म्हणजे शंभूराजांच्या पत्नीची भूमिका प्राजक्ताने साकारली होती आणि खऱ्या आयुष्यातही तिच्या पतीचे नाव देखील शंभूराज असल्याने हा योगायोगच म्हणायला हरकत नाही.

आणखी वाचा – घरातील स्त्रियांना रुग्णालयात जाण्यास बंदी, मासिक पाळी येत नव्हती म्हणून…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली…

आता साखरपुडा पार पडल्यावर प्राजक्ता शंभूराज यांच्यासह पंढरपूरला विठू माऊलीचा दर्शन घेण्यासाठी पोहोचली. या मागच एक खास कारण म्हणजे श्रावणातील एकादशी. श्रावणातील एकादशी निमित्त प्राजक्ता आणि शंभुराज यांनी विठू माऊलीचे दर्शन घेतले. मंदिरात विठुरायाचा आशीर्वाद घेतानाचा सुंदर फोटो शंभूराज यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. शंभूराज यांनी फोटो शेअर करत याला एकादशी विठ्ठल माऊली असं कॅप्शन दिलं आहे. त्यांच्या या फोटोवर कमेंटचा वर्षाव होताना पाहायला मिळतोय.

आणखी वाचा – १० वेळा तरी हनुमान चालिसा म्हणाले आणि…; भर पावसात प्रवासादरम्यान झाले अमृता खानविलकरचे हाल, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

लग्नाआधी प्राजक्ता आणि शंभूराज यांनी देवदर्शन केल्याने चाहत्यांची मन जिंकली आहेत. ‘विठ्ठल रुक्मिणी’, ‘तुमची जोडी खूपच सुंदर आहे’, ‘आयुष्याची नयनरम्य वाटचाल करत असताना कसल्याही प्रकारचे दुःख वाट्याला येऊ नये हीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना’, अशा अनेक प्रतिक्रिया करत त्यांच्या फोटोवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Tags: marathi actresspandharpur photoprajakta gaikwad
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Winner
Entertainment

‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ची विजेती ठरली तन्वी कोलते, ट्रॉफीसह मिळवली इतकी रक्कम, कौतुकाचा वर्षाव

एप्रिल 20, 2026 | 10:15 am
Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Next Post
jui gadkari emotional post

"Show must go on म्हणणं सोपं आहे?", पूर्णा आजींना जाऊन चार दिवस होताच जुई गडकरीला येतेय आठवण, भावुक होत म्हणाली, "शेवटचा व्हिडीओ…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.