शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

घरातील स्त्रियांना रुग्णालयात जाण्यास बंदी, मासिक पाळी येत नव्हती म्हणून…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 19, 2025 | 1:48 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
kangana ranaut

घरातील स्त्रियांना रुग्णालयात जाण्यास बंदी, मासिक पाळी येत नव्हती म्हणून…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली…

Kangana Ranaut childhood : कलाकार मंडळींचा स्ट्रगल काही त्यांना चुकलेला नाहीये. अशी अनेक कलाकार मंडळी आहेत ज्यांचा कुणीही वारसा हक्क नसताना त्यांनी सिनेविश्वात स्वतःच नाव स्थापन केलं. यापैकीच एक अभिनेत्री म्हणजेच बॉलीवूड क्वीन कंगना रनौत. बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारत कंगनाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं, कंगनाला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. मात्र, ती कोणत्याही ट्रोलिंगला न जुमानता तिनं वेळोवेळी सडेतोड उत्तर दिलेलं पाहायला मिळालं. कंगना ही मूळची हिमाचल प्रदेशची. मंडी या जिल्ह्यातील एका लहान गावात तिचा जन्म झाला. आई-वडिलांची ती दुसरी मुलगी. कंगनाला एक मोठी बहीण आणि एक धाकटा भाऊ आहे. कंगनाला एक मोठा भाऊही होता पण त्याचे अवघ्या जन्माच्या दहाव्या दिवशीच निधन झाल्याचं तिनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. यावेळी कंगनाने तिला उशिरा आलेल्या मासिक पाळी बद्दल आणि कुटुंबातील गरोदर महिलांना प्रसुतीसाठी रुग्णालयात नेण्यात येत नसल्याबद्दलचा खुलासा देखील केला आहे.

हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणाली, “माझ्या आईला पहिला मुलगा झाला होता, पण तो दगावला, जन्मानंतर अवघ्या १० दिवसांतच तो गेला. माझ्या वडिलांनी त्याचे नाव हिरो ठेवले होते, त्यामुळे त्याला गमावणं हा त्यांच्यासाठी मोठा धक्का होता. त्याचा जन्म रुग्णालयात झाला होता, त्याचं वजन ३.५ किलो होतं आणि त्याला कोणतीही समस्या नव्हती. त्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे मुलाचा मृत्यू झाला, असं माझ्या आईला वाटत होते. त्यांनी त्याची नाळ चुकीच्या पद्धतीने कापली, असं तिचं म्हणणं होतं.

आणखी वाचा – पावसाच्या पाण्यात घसरून पडल्या, चालताही येईना आणि…; वंदना गुप्तेंना गंभीर दुखापत, नाटकाचे प्रयोगही रद्द, म्हणाल्या, “खूप दुःखदायक…”

View this post on Instagram

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

कंगना पुढे म्हणाली, “या घटनेनंतर माझी आजी म्हणाली की यानंतर आईची प्रसूती रुग्णालयात होणार नाही. या घटनेनंतर, माझ्या आईला तीन अपत्ये झाली, काकूला दोन अपत्ये झाली. आम्हा सर्व भावंडांचा जन्म एकाच घरात, एकाच खोलीत झाला. कुणालाच रुग्णालयात नेण्याची परवानगी नव्हती”. मासिक पाळी उशीरा आल्याने आईने बाहुल्या फेकून दिल्या होत्या, हा प्रसंग कंगना रणौतने सांगितला. “माझ्या सर्व मैत्रिणींना सहावी ते नववीच्या दरम्यान मासिक पाळी आली, पण मला आली नव्हती. त्यामुळे माझ्या आईला काळजी वाटत होती. त्यावेळी मला बाहुल्यांचं वेड होतं. माझ्याकडे खूप साऱ्या बाहुल्या होत्या. एके दिवशी, माझी आई खूप रागावली. ‘आधीच तुला मासिक पाळी आलेली नाही आणि हिला अजूनही बाहुल्यांशी खेळायचंय,’ असं म्हणत तिने त्या फेकून दिल्या होत्या”.

आणखी वाचा – ‘३ इडियट्स’ फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन, वयाच्या ९१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

शेवटी कंगना म्हणाली, “बाहुल्यांमुळे मला पाळी वेळेवर येत नसल्याचं तिला वाटत होतं. मग एके दिवशी, मी सकाळी उठले तेव्हा मला रक्ताचे डाग दिसले. मी घाबरले होते, पण माझी आई आनंदी होती की मला अखेर मासिक पाळी सुरू झाली”.

Tags: bollywood newsentertainmentkangana ranaut
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
amruta khanvilkar travel

१० वेळा तरी हनुमान चालिसा म्हणाले आणि…; भर पावसात प्रवासादरम्यान झाले अमृता खानविलकरचे हाल, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.